टेलीमार्केटिंग कॉलवर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे.

Please follow and like us:
Whatsapp
LINKEDIN
Reddit

टेलीमार्केटिंग कॉलवर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे-
संघटनेच्या निदर्शनास कित्येक सामान्य नागरिकांना वेळी अवेळी बॅंका, इन्शुरन्स व मोबाईल कंपन्या यांचे एजंट कॉल करून त्यांच्या टेली मार्केटिंगच्या कारणास्तव प्रचंड त्रास देत असल्याचे वास्तव समोर आले आहे. कित्येक महिला तसेच वरिष्ठ नागरिक या अशा कॉल करणाऱ्यांना विनंती अथवा कायदेशीर कारवाई करण्याची नोटीसही देतात मात्र त्यावर अशा एजंटकडून नेहमी मुजोर उत्तरच देण्यात येते. मात्र इच्छा असूनही कित्येक नागरिक केवळ कायद्याच्या ज्ञाना अभावी कोणतीही कारवाई करीत नाहीत व नाहक त्रास सहन करीत राहतात.

मा सर्वोच्च न्यायालयाने असे नागरिकांना नकोसे असणारे कॉल हे त्यांच्या मुलभूत अधिकारांवर हनन करण्याचे प्रकार असल्याचे आपल्या कित्येक निर्णयांमध्ये स्पष्ट केले आहे. अशा नको असणाऱ्या कॉलमुळे होणारी झोपमोड, मानसिक स्वास्थ्यास होणारा त्रास यामुळे कित्येकांना गंभीर मानसिक त्रासाला सामोरे जाण्याची उदाहरणे समोर आली आहेत.

परंतु कित्येक नागरिकांना अशा अनाहूत टेलीमार्केटिंग कॉलवर कारवाई करण्यासाठी Telecom Regulatory Authority of India म्हणजेच ट्रायद्वारे कित्येक वर्षांपासून एक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून अशा कॉल करणाऱ्या व्यक्तींचे क्रमांक आपण कायमचे बंद करू शकता व तेही घरी बसून आणि हे सर्व केवळ एक कॉल अथवा मेसेजद्वारे करू शकता हे जाणून आश्चर्याचा सुखद धक्का नक्की बसेल.

टेलीमार्केटिंग कॉलवर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे-

वर नमूद केलेप्रमाणे कोणत्याही कोर्टात न जाता केवळ एका कॉल अथवा एसएमएसद्वारे टेलीमार्केटिंग करणाऱ्या व्यक्तीचा क्रमांक आपण खाली नमूद केलेल्या प्रक्रियेने कायमचे बंद करू शकता-

सर्वप्रथम आपणास ‘Do Not Disturb Registry’ म्हणजेच ‘डू नॉट डिस्टर्ब’ या सुविधेत नोंद करावी लागेल. त्यासाठी आपणास २ प्रकारे नोंद करता येते ती खालीलप्रमाणे-

Top 9 Deals for Recharge, Travel, Hotel & Services -Grab Before They Expire. Click Slider Arrow Button Below to Check All the Latest Deals One By One!

१) एसएमएस द्वारे-
‘START 0’ असा संदेश टाईप करून 1909
या क्रमांकावर पाठवायचा आहे.

२)  1909 या क्रमांकवर कॉलद्वारे-

या  क्रमांकवर कॉल करून आपण ग्राहक सेवा प्रतिनिधी म्हणजेच ‘कस्टमर केअर एक्झक्युटीव’ ला ‘Do Not Disturb Registry’ म्हणजेच ‘डू नॉट डिस्टर्ब’ या सुविधेत नोंद करावयास सांगू शकता.

वर नमूद केलेप्रमाणे एकदा आपण Fully Blocked Category या Telecom Regulatory Authority of India म्हणजेच ट्रायने राष्ट्रीय पातळीवर टेलीकॉम कंपन्यांना ज्या नागरिकांना कोणतेही टेलीमार्केटिंग कॉल नको आहेत त्या वर्गात आपले नाव दाखल केले जाते. त्यामुळे त्या क्रमांकावर कुणीही टेलीमार्केटिंग कॉल करू नये असे बंधन कायद्याने येते. सामान्यतः एकदा वर नमूद केलेप्रमाणे ‘Do Not Disturb Registry’ म्हणजेच ‘डू नॉट डिस्टर्ब’ मध्ये ९ दिवसांच्या आत असे टेलीमार्केटिंग कॉल येणे कायद्याने बंद झाले पाहिजे.

मुळात वर नमूद केलेली नोंद ही आपल्यापैकी कित्येक वाचकांनी आधीच केली असणार आहे. खरी समस्या म्हणजे ‘Do Not Disturb Registry’ (DND) म्हणजेच ‘डू नॉट डिस्टर्ब’ची नोंद करूनही लोकांना खाजगी मोबाईल क्रमांकावरूनही टेलीमार्केटिंग कॉल येणे सुरूच राहते.

Top 9 Deals for Baby, Fashion, Health & Beauty-Grab Before They Expire. Click Slider Arrow Button Below to Check All the Latest Deals One By One!

वर नोंद करूनही टेलीमार्केटिंग करून कॉल करणाऱ्यांचा नंबर कायमचा बंद करणे-
वर नमूद केलेप्रमाणे ‘Do Not Disturb Registry’ म्हणजेच ‘डू नॉट डिस्टर्ब’ प्रवर्गात नोंद केल्यानंतर कशा पद्धतीने असे बेकायदा व त्रासदायक कॉल करणाऱ्याचा क्रमांक मग भले तो खाजगी मोबाईल क्रमांक असो अथवा लँडलाईन असो तो कायमचा बंद कसा करावा व अशा त्रासदायक लोकांना कशी कायमची अद्दल घडवावी त्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे-

या प्रक्रियाही २ पद्धतीने करता येतात, एक एसएमएस द्वारे व दुसरे म्हणजे कॉलद्वारे.

(अत्यंत महत्वाचे- आपणास टेलीमार्केटिंग कॉल आल्याच्या ७२ तासांच्या आत खाली नमूद प्रक्रियेद्वारे तक्रार करण्याचे सामान्य बंधन आहे, काही कारणास्तव उशीर झाल्यास कॉलद्वारे तक्रार करता येऊ शकते मात्र लोकांनी असे टेलीमार्केटिंग कॉल आल्याच्या ७२ तासांत तक्रार करून टाकणे केव्हाही हितकारक!).

१) एसएमएस द्वारे-
ग्राहकांनी ट्रायच्या नियमानुसार खालीलप्रमाणे एसएमएसद्वारे तक्रार करावी-
”the unsolicited commercial communication, XXXXXXXXXX,dd/mm/yy” to 1909. Where XXXXXXXXXX – is the telephone number or header of the SMS, from which the Unsolicited Telemarketing Call has originated.

म्हणजेच समजा ग्राहकास ‘123456789’ या मोबाईल क्रमांकवरून  दि.01.01.2018 रोजी अनाहूत टेली मार्केटिंग कॉल आला आहे. तर ज्यांना एसएमएसद्वारे  तक्रार करायची आहे त्यांनी खालीलप्रमाणे 1909 या क्रमांकवर मेसेज करावा-
the unsolicited commercial communication, 123456789,01/01/2018′

बस्स! एवढे केले की आपल्या मोबाइल कंपनीस ९ दिवसांच्या आत अशा कॉल करणाऱ्या क्रमांकावर कायमची बंदी घालण्याची तरतूद Telecom Regulatory Authority of India म्हणजेच ट्रायने करून ठेवली आहे. मोबाईल कंपनीने जर ९ दिवसांत कारवाई केली नाही तर त्यांच्या विरोधातही शास्तीची कारवाई करण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

२) कॉलद्वारे तक्रार-
वर नमूद केलेप्रमाणे एसएमएसद्वारे तक्रारीस मोबाईल कंपन्या ‘मुद्दाम’ काही ‘एरर’ दाखवत असल्यास १९०९ या क्रमांकवर कॉल करून टेलीमार्केटिंग कॉलचा सर्व तपशील द्यावा आणि त्यानंतर ९ दिवसांत कारवाई करून देण्याचे तुमच्या मोबाईल कंपनीवर कायद्याने बंधनकारक राहील.

यशस्वी परिणाम-
माझेच उदाहरण घ्या, मला एका व्यक्तीने वोडाफोन कंपनीतर्फे बोलत असून टेली मार्केटिंगसाठी कॉल केला व त्यास तसे न करण्याचे कायद्याची तरतूद सांगूनही ‘काय करायचे ते करून घ्या’ असे आवाहन दिले. त्यानुसार मी तक्रार करताच सदर व्यक्तीचा मोबाईल क्रमांक कायमचा बंद करण्यात आल्याचा संदेश मला प्राप्त झाला. त्या एसएमएसचा स्नॅपशॉट खालीलप्रमाणे-

Telemarketer from Vodafone banned post TRAI's 1909 SMS Complaint
Telemarketer from Vodafone banned post TRAI’s 1909 SMS Complaint

टेलीमार्केटिंग कॉलवर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे-

यापूर्वीच्या इंग्रजी लेखाचा हा लेख मराठी भाषांतर असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा विशेषतः राज्यातील ग्रामीण भागात पोहोचावा म्हणून जास्तीत जास्त शेअर करा. लेख आवडल्यास लाईक करा. तसेच संघटनेच्या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्धच्या चळवळीचे अपडेट खालील फेसबुक तसेच ट्विटर पेजद्वारे घेण्यासाठी ‘Like’ अथवा ‘Follow’ जरूर करा, जयहिंद!

https://www.facebook.com/jaihindbks

https://twitter.com/jaihindbks

-ॲड.सिद्धार्थशंकर शर्मा

संस्थापक अध्यक्ष, भारतीय क्रांतिकारी संघटना 

You may be Lawyer, Doctor, Engineer or even an Artist, Turn Your Talent or Passion into Blogging by Building Your Own Website Without the Help of Professional Programmer With Unlimited Earning Options on WordPress which powers 30% of the world websites.

WordPress.com

जरूर वाचा-

शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका

सरस्वती मंदिर शाळेने अखेरीस ‘सीबीएसई’चा बोर्ड हटविला

महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती.

महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका

महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी

महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी

टेलीमार्केटिंग कॉलवर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याने शाळेची महत्वाची माहिती मिळविणे.

महाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत.

बाल हक्क संरक्षण आयोगाची भयानक कुचंबणा- राज्य सरकारचा काळा चेहरा उघड.

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे अधिकारींविरोधात तक्रार दाखल.

कायदे व याचिका संदर्भ-शाळांकडून मुलांना शारीरिक व मानसिक त्रास…

 

Please follow and like us:
Whatsapp
LINKEDIN
Reddit