महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती.
मराठी कायदे मार्गदर्शन

महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती

Share

महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती- (How to see Starred question & attention notice on website of Maharashtra Legislative Assembly & Maharashtra Legislative Council)- कित्येक नागरिकांना आपल्या स्थानिक भागातील आमदारांनी विधानसभा अथवा विधानपरिषद येथे कोणते तारांकित प्रश्न विचारले अथवा लक्षवेधी सूचना मांडली याबाबत अनभिज्ञता असते. कित्येक नागरिकांनी संघटनेस अशा प्रश्नांची यादी, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. यादी कशी मिळवावी याबाबतही संघटनेस मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती.

मुळात याचे उत्तर अत्यंत सोपे असून महाराष्ट्र विधीमंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरच ही माहिती उपलब्ध असून  सामान्य नागरिक तेथून आमदारांनी कोणते तारांकित प्रश्न विचारले, लक्षवेधी सूचना मांडल्या, सादर केलेली विधेयके ई. यांची यादी पीडीएफ स्वरुपात पाहू शकतात अशी व्यवस्था करून ठेवण्यात आली आहे. केवळ नागरिकांनी ते वेळोवेळी तपासले पाहिजे आणि फाईल्स डाउनलोड करून ठेवल्या तर अशी माहिती त्यांना उपलब्ध होईलच शिवाय राज्यभरातील जनतेस ते अशा फाईल्स सोशल मिडीयाच्या माध्यमातून पाठवू शकतात व आपापल्या भागातील आमदार अथवा राज्यातील सर्व आमदार त्यांनीच निवडलेल्या प्रश्नांवर सक्रीय आहेत किंवा प्रश्न केवळ विचारून शांत बसतात यासंबंधी माहिती मिळवू शकतात. प्रश्न विचारून ते हेतुपरस्पर शांत बसले असल्यास त्यांनीच विचारलेल्या प्रश्नांची मिडिया अथवा सोशल मीडियाद्वारे त्यांना आठवण करून नक्की जाब विचारावा.

तरी राज्यातील ग्रामीण जनतेस अधिक सोप्या पद्धतीने कळावे म्हणून ग्राफिकच्या माध्यमातून तारांकित प्रश्न अथवा लक्षवेधी सूचना, विधेयके ई. कसे पाहावे व डाउनलोड करावे याची प्रक्रिया खाली दिली आहे-
१) सर्वप्रथम महाराष्ट्र विधीमंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे. त्याची लिंक खालीलप्रमाणे आहे-
येथे क्लिक करा-महाराष्ट्र विधीमंडळाची अधिकृत वेबसाईट.

२) वर नमूद केलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर खालीलप्रमाणे वेबसाईटचे होमपेज उघडले जाईल-

महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना ई. माहिती.

वर नमूद केलेप्रमाणे होमपेजमध्ये नागरिकांना विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहातील माहिती दिसतील. त्यामध्ये अनेक प्रवर्ग दिसतील ज्यामध्ये,  प्रश्नांची सूची, तारांकित प्रश्नांची यादी, लक्षवेधी सूचनांची यादी, विधेयके ई. दिसतील. त्यावर क्लिक केलेनंतर पुढील माहिती उघड होईल. उदाहरणार्थ या पेजमधील विधानसभेच्या ‘प्रश्नांची यादी’ वर क्लिक केले असता एक कॅलेंडर उघड झाले आहे ते खालीलप्रमाणे-

महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती.
महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती.

त्यामध्ये अधिवेशनाच्या आदल्या दिवशीची म्हणजेच २० नोव्हेंबर २०१८ व उद्या म्हणजेच २२ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या तारांकित प्रश्नाची यादी दिसते. संबंधित तारखांवर क्लिक केल्यास त्या दिवसाची पीडीएफ फाईल भेटेल. त्यानंतर अथवा पुढील फाईल संघटनेच्या तरी निदर्शनास आले नाही. म्हणजेच आमच्या मते नागरिकांनी तत्काळ या फाईल्स डाऊनलोड करून ते सोशल मीडियाद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविलेले कधीही बेहतर!

भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध कायद्याने कसे लढावे याबाबत आमच्या अत्यंत महत्वाच्या लेखांची एकत्रित मालिका वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
https://wp.me/P9WJa1-MV

हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेअर करा, खाली दिलेले आमचे विविध फेसबुक व ट्विटर खातेंवर ‘Like’ व  ‘Follow’ करा, फेसबुक पेजला ‘Like’ केल्यानंतर सुद्धा पेजवरील ‘Follow’ बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कुठलेही यापुढील लेख जाहीर केले तर त्याचे थेट अपडेट आपणास भेटतील.
संघटनेचे फेसबुक पेज लिंक-
https://www.facebook.com/jaihindbks

ट्विटर पेजचे लिंक-
https://twitter.com/jaihindbks
तसेच या पेजवर आपला ई मेल टाकून करावा, जेणेकरून या वेबसाईटवरील प्रत्येक लेख हा थेट आपल्या ई-मेल वर प्राप्त होईल, जयहिंद!
-ॲड.सिद्धार्थशंकर अ. शर्मा
(संस्थापक, अध्यक्ष, भारतीय क्रांतिकारी संघटना)

सूचना- कायदा हे वेळोवेळी बदलत असतो कित्येक वेळा न्यायालये ते रद्दही करत असतात, वर नमूद माहिती ही राज्य शासनाच्या वेबसाईटवरील माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी याबाबत कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा व अद्ययावत माहिती घ्यावी, अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.


Share