
सरस्वती मंदिर शाळेने अखेरीस ‘सीबीएसई’चा बोर्ड हटविला- माहीमच्या सरस्वती मंदिर शाळेने आपल्या प्रवेशद्वारावरील ‘सीबीएसई’ बोर्ड अखेरीस हटविला आहे. शाळेच्या गैरकारभाराविरोधात आंदोलक पालकांनी यास महत्वाचे यश मानले आहे तर दुसरीकडे इतर पालकांमध्ये कमालीचे चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.
याबाबत सुरुवातीस बहिष्कृत करण्यात आलेल्या मात्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे तक्रार केलेनंतर पाल्यांना शाळेत येण्याची परवानगी भेटलेल्या शाळेचे पालक श्री.मकरंद काणे यांनी सांगितले की, ‘मी सुरुवातीपासून शाळेस सीबीएसई बोर्डाची संलग्नता नसलेबाबत आक्षेप नोंदवीत आलो आहे. मात्र तरीही शाळा प्रशासन स्वतःस कित्येक वर्षांपासून सीबीएसई शाळा घोषित करीत आली आहे. याबाबत मी सीबीएसई बोर्डाशी संपर्क केला असता त्यांनी शाळेस सीबीएसई बोर्डाची संलग्नता नसल्याची धक्कादायक माहिती दिली. शाळेने प्रवेशद्वारावरील बोर्ड का काढला याचे कारण माहित नसले तरी याबाबत मी केलेल्या पाठपुराव्यास थोडे यश प्राप्त झाले आहे. शाळेस पालकांना आता अंधारात ठेवता येणार नाही.’
याबाबत नाव न सांगण्याच्या अटीवर एका पालकाने सांगितले की, ‘आम्ही शाळेची मोठे शुल्क हे सीबीएसई शाळा म्हणून भरत आलो आहोत. अगदी शाळा प्रशासनसुद्धा त्यांच्या फी वाढीस सीबीएसई मान्यता असल्याचे कारण देत आले आहे. आता अशी माहिती समोर आल्याने मला माझ्या पाल्याच्या शिक्षणाची काळजी वाटत असून त्याच्या शैक्षणिक भवितव्याबाबत चिंता वाटत आहे’.
याबाबत अधिक माहिती देताना न्यायालय व आयोग येथे पालकांची बाजू मांडणाऱ्या ॲड.सिद्धार्थशंकर शर्मा यांनी सांगितले की, ‘तूर्तास हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने त्याबाबत अधिक भाष्य करणे उचित होणार नाही. मात्र संलग्नता न घेता पालकांना सीबीएसई बोर्डाची मान्यता दाखविल्यास त्याबाबत पालक फसवणुकीचा गुन्हा दाखल करू शकतात’.
राज्यभरातील कित्येक खाजगी शाळा या सीबीएसई बोर्डाची परवानगी न घेता पालकांना संलग्नता असल्याचे भासवून मोठे शुल्क आकारून पालकांची फसवणूक केल्याचे कित्येक पालकांनी वेळोवेळी समोर आणले आहे. परिणामी या घटनेने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध कायद्याने कसे लढावे याबाबत आमच्या अत्यंत महत्वाच्या लेखांची एकत्रित मालिका वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
https://wp.me/P9WJa1-MV
हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेअर करा, खाली दिलेले आमचे विविध फेसबुक व ट्विटर खातेंवर ‘Like’ व ‘Follow’ करा, फेसबुक पेजला ‘Like’ केल्यानंतर सुद्धा पेजवरील ‘Follow’ बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कुठलेही यापुढील लेख जाहीर केले तर त्याचे थेट अपडेट आपणास भेटतील.
संघटनेचे फेसबुक पेज लिंक-
https://www.facebook.com/jaihindbks
ट्विटर पेजचे लिंक-
https://twitter.com/jaihindbks
तसेच या पेजवर आपला ई मेल टाकून करावा, जेणेकरून या वेबसाईटवरील प्रत्येक लेख हा थेट आपल्या ई-मेल वर प्राप्त होईल, जयहिंद!