मराठी कायदे मार्गदर्शन

शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका

Share

शाळा सीबीएसई संलग्न आहे किंवा नाही तपासणे- नुकतेच कित्येक शाळा या सीबीएसई बोर्डाशी संलग्न नसूनही पालकांना सीबीएसई बोर्डाशी संलग्न असल्याची खोटी माहिती देऊन पालकांची फसवणूक करीत असल्याचे प्रकार संघटनेच्या निदर्शनास आले आहेत. या बोगस शाळा उघडपणे पालकांना फी पावती, वार्षिक अहवाल ई. वर सीबीएसई बोर्डाशी संलग्न असल्याचे नमूद करीत असून अवाजवी फी वाढ करण्यामागे सीबीएसई बोर्डाशी संलग्नता हे कारण पुढे करीत असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत.

इतकेच नाही तर या बोगस शाळा अभ्यासक्रम सुद्धा सीबीएसई बोर्डाप्रमाणे असल्याचे सांगून पुस्तकांसाठी मोठी  फी वसूल करीत आहेत. काही पालकांनीही संघटनेस याबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती. परिणामी संघटनेकडून हा लेख जाहीर करण्यात येत आहे.

*शाळांना सीबीएसई संलग्नता कशी मिळते, त्यासाठी काय निकष आहेत, सीबीएसई शाळांना कोणते महत्वाचे नियम पाळणे बंधनकारक आहेत ई. माहिती पालकांना मराठीत माहिती व्हावी  यासाठी नुकतेच संघटनेतर्फे जाहीर करण्यात आलेल्या लेखाची लिंक खालीलप्रमाणे-
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अथवा सीबीएसईच्या संलग्नतेचे व इतर महत्वाचे नियम व कायदे

हा लेख आपण आमच्या युट्युब चॅनलवर व्हिडियो स्वरूपातही पाहू शकता किंवा खालील उर्वरित लेख वाचावा

शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका- मुळात शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणे ही अत्यंत सोपी बाब असून ऑनलाईन प्रणालीद्वारे काही मिनिटांत पालक याबाबत अधिकृत माहिती मिळवू शकतात. यासाठी पालकांनी सर्वप्रथम सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाईट उघडावी ज्याची लिंक खालीलप्रमाणे आहे-http://cbse.nic.in/newsite/index.html

वर नमूद लिंक क्लिक केल्यानंतर सीबीएसई बोर्डाची खालीलप्रमाणे वेबसाईट उघड होईल-

शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका
शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका

वर नमूद केलेप्रमाणे सीबीएसईचे पेज उघड झाल्यानंतर त्यातील ‘Schools Directory’ बटनवर या (लाल रंगाने वर्तुळाकार अधोरेखित) क्लिक करावे. त्यानंतर खालीलप्रमाणे पेज दिसेल-

शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका
शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका

वरीलप्रमाणे पेज उघड झाल्यानंतर आपण शाळेच्या नावानुसार, संलग्नता क्रमांक, राज्य अथवा प्रदेशानुसार माहिती भरून शाळा खरेच सीबीएसईला संलग्न आहे की नाही याची अधिकृत माहिती मिळवू शकता. वरीलप्रमाणे प्रक्रिया करण्यापेक्षा काहीजण थेट संलग्नतेच्या पेजवर खालील लिंकद्वारे जाऊ शकतात –http://cbseaff.nic.in/cbse_aff/schdir_Report/userview.aspx

नुकतेच मुंबई मिरर मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार शाळेचे या वेबसाईटवर नाव नसेल तर शाळेस कोणत्याही प्रकारे स्वतःला सीबीएसई शाळा दाखविण्याचा अधिकार नसल्याचे सीबीएसईच्या दिल्लीच्या ऑफिसद्वारे स्पष्ट करण्यात आल्याची माहिती आहे. सदर बातमीची लिंक ही खालीलप्रमाणे आहे-
https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/parents-confused-after-mahim-school-drops-mention-of-cbse/articleshow/67069226.cms

तसेच ज्या शाळा स्वतःला अशा पद्धतीने बोगस सीबीएसई संलग्नता दर्शवित आहेत त्यांच्यावर पालक फौजदारी कारवाई तसेच सीबीएसई बोर्डास अशा शाळांनी संलग्नता अर्ज केला असेल तर तो नाकारण्यासाठी तक्रार अर्ज करावा असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात येत आहे.

हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेअर करा, खाली दिलेले आमचे विविध फेसबुक व ट्विटर खातेंवर ‘Like’ व  ‘Follow’ करा, फेसबुक पेजला ‘Like’ केल्यानंतर सुद्धा पेजवरील ‘Follow’ बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कुठलेही यापुढील लेख जाहीर केले तर त्याचे थेट अपडेट आपणास भेटतील.
संघटनेचे फेसबुक पेज लिंक-
https://www.facebook.com/jaihindbks

ट्विटर पेजचे लिंक-
https://twitter.com/jaihindbks
तसेच या पेजवर आपला ई मेल टाकून करावा, जेणेकरून या वेबसाईटवरील प्रत्येक लेख हा थेट आपल्या ई-मेल वर प्राप्त होईल, जयहिंद!
-ॲड.सिद्धार्थशंकर अ. शर्मा
(संस्थापक, अध्यक्ष, भारतीय क्रांतिकारी संघटना)

सूचना- वर नमूद माहिती ही शासनाच्या वेबसाईटवरील माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी याबाबत कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा व अद्ययावत माहिती घ्यावी, अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

 


Share