मराठी कायदे मार्गदर्शन, मराठी न्यूज

भारत के वीर- सरकारची थेट शहीद जवानांच्या खातेमध्ये देणगी योजनेची सविस्तर माहिती.

Share

देशासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या शहीद जवानांना थेट मदत करावी अशी प्रत्येक सच्च्या भारतीयाची मनापासून इच्छा असते. जेव्हा जेव्हा देशासाठी युद्ध अथवा तत्सम आणीबाणीमध्ये आर्थिक मदतीची गरज भासली आहे अशावेळी देशाचे नागरिक कधीही मागे हटलेले नाहीत. चीनविरोधातील युद्धात कित्येक माता भगिनींनी आपले मंगळसूत्रसुद्धा देणगी म्हणून राष्ट्रास समर्पित केल्याचे देशाच्या गौरवशाली इतिहासात दाखले आहेत.

मात्र शहीद जवान देशाच्या प्रत्येक भागात असल्याने कित्येक नागरिकांना त्यांना थेट मदत कशी करावी हा प्रश्न पडतो. या समस्येस निराकरण म्हणजे केंद्रीय गृह विभागाने अमलांत आणलेली ‘भारत के वीर’ ही योजना आहे. या योजनेद्वारे आपण शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांस थेट त्यांच्या खातेत रक्कम व तेही ऑनलाईन जमा करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

इतकेच नाही  तर सदर वेबसाईटवर शहीद जवानांचे फोटो जाहीर करण्यात आले असून त्यांना देशासाठी वीरगती कशी प्राप्त झाली, त्यांच्यामागील कुटुंबीय ई. सर्वांची माहिती या वेबसाईटवर देण्यात आली आहे. तसेच एकदा का संबंधित शहीद जवानांच्या खातेमध्ये पंधरा लाख रुपये जमा झाले की त्या जवानांचा फोटो आपोआप वेबसाईटवरून काढण्यात येऊन इतर शहीद जवानांचे फोटो अपलोड होतील.

ही योजना भारत सरकारची अधिकृत योजना असून त्या वेबसाईटची अधिकृत लिंक खालीलप्रमाणे-
https://bharatkeveer.gov.in/
या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर खालीलप्रमाणे पेज दिसेल-
Header
त्यानंतर Contribute To या बटनवर क्लिक केलेनंतर (वरील फोटोमधील लाल रंगात अधोरेखित भाग पहा) अजून २ बटन्स म्हणजेच ‘Bravehearts’ आणि ‘Bharat Ke Veer Corpus Fund’ दिसतील. यातील ‘Bravehearts’ या बटनवर क्लिक केलेनंतर आपण थेट शहीद जवानांच्या अकाऊंटमध्ये पैसे भरू शकता तर ‘Bharat Ke Veer Corpus Fund’ या बटनवर क्लिक करून आपण सामान्य फंडमध्ये रक्कम जमा करू शकता जी सरकारकडून समान पद्धतीने सर्व शहीद जवानांच्या खातेमध्ये जमा केली जाईल.

उदाहरण दाखल आपण ‘Bravehearts’ या बटनवर क्लिक केलेनंतर खालीलप्रमाणे शहीद जवानांचे फोटो असलेले पेज दिसेल-
Untitledgg-2
आणि यातील पहिले फोटोमध्ये दिसणारे शहीद स्व.रबिंद्र नाथ मोडक यांचे तपशील पाहिले असता त्यांची खालीलप्रमाणे माहिती उघड  होईल-

भारत के वीर- सरकारची थेट शहीद जवानांच्या खातेमध्ये देणगी योजनेची सविस्तर माहिती.
भारत के वीर- सरकारची थेट शहीद जवानांच्या खातेमध्ये देणगी योजनेची सविस्तर माहिती.

त्यांचे खातेत या क्षणास रु.१३,१३,१६२/- इतकी रक्कम जमा तसेच ग्रेनेड हल्यात त्यांना कशी वीरगती प्राप्त झाली, त्यांचे कुटुंबीय ई.बाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यानंतर आपण ‘I Would Like to Contribute’  वर क्लिक करून पुढील माहिती भरून जसे की मोबाईल क्रमांक ई. द्वारा देणगी थेट जमा करू शकता. आपण केलेल्या योगदानाच्या रक्कमेस शासनाने आयकर कायद्यानुसार कलम 80(G) ची सूटही दिलेली आहे.

नक्की पुढे या, फुल नाही तर फुलाची पाकळी व्हा, सोन्याचा पक्षी असलेला आपला देश हळूहळू पुन्हा प्रगतीपथावर येत आहे व हिंद जागतिक महासत्ता बनेलच, परंतु सध्या बिकट अवस्थेत देश असूनही तुमच्या आमच्यासाठी ऐन तारुण्यात देशासाठी प्राणाचे त्याग करणाऱ्या शहीद जवानांना थोडी फार का होईना मदत नक्की करा. आपण देणगी दिलेनंतर शहीद जवानांसाठीचे संदेश कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा त्याने इतरांना प्रेरणा नक्की भेटेल हा त्यामागचा उद्देश!

आपणास या वेबसाईटवर सामान्य जनतेसाठी इंग्रजी व मराठीत भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध कायद्याने मार्गदर्शन करणारे कित्येक लेख मोफत जाहीर केल्याचे माहित असेलच, नक्की वाचा व भ्रष्टाचार विरोधातील लढ्यात सामील व्हा, या वेबसाईटवर आमच्या लीगल टीमची पूर्ण देखरेख असून वर दिलेली माहिती व सरकारी वेबसाईट लिंक यांची सविस्तर शहानिशा करूनच हा लेख जाहीर करण्यात आला आहे याची दखल घ्यावी. जयहिंद!

भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध कायद्याने कसे लढावे याबाबत आमच्या अत्यंत महत्वाच्या लेखांची एकत्रित मालिका वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
https://wp.me/P9WJa1-MV

हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेअर करा, खाली दिलेले आमचे विविध फेसबुक व ट्विटर खातेंवर ‘Like’ व  ‘Follow’ करा, फेसबुक पेजला ‘Like’ केल्यानंतर सुद्धा पेजवरील ‘Follow’ बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कुठलेही यापुढील लेख जाहीर केले तर त्याचे थेट अपडेट आपणास भेटतील.
संघटनेचे फेसबुक पेज लिंक-
https://www.facebook.com/jaihindbks

ट्विटर पेजचे लिंक-
https://twitter.com/jaihindbks
तसेच या पेजवर आपला ई मेल टाकून करावा, जेणेकरून या वेबसाईटवरील प्रत्येक लेख हा थेट आपल्या ई-मेल वर प्राप्त होईल, जयहिंद!


Share

Leave a Reply