अवाजवी चुकीचे वीजबिल तक्रार ग्राहकांचे कायदेशीर अधिकार
मराठी कायदे मार्गदर्शन

अवाजवी व चुकीच्या वीजबिलाविरोधात तक्रार तसेच विज ग्राहकांचे कायदेशीर अधिकार

Share

अवाजवी व चुकीच्या वीजबिलाविरोधात तक्रार तसेच ग्राहकांचे कायदेशीर अधिकार (Legal Remedy against Wrong & Excessive Electricity Bills under The Electricity Act 2003 Marathi) –
देशभरातील कोणत्याही वीज पुरवठादार कंपनीने चुकीचे अथवा अवाजवी बील (Wrong & Excessive Electricity Bill) दिल्यास सामान्य जनतेस होणारा त्रास (विशेषतः महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित-एमएसईबी Maharashtra State Electricity Board-MSEB) कडून नुकतेच संघटनेस काही प्रकरणांत निदर्शनास आले. कित्येक वेळा असे चुकीचे बील हे सामान्यपणे येणाऱ्या बिलांच्या कित्येक पटीने जास्त येत असल्याने व संबंधित वीज कंपनीचे कर्मचारी असे थकीत विजबील भरण्याची सक्ती अन्यथा थेट वीजजोड तोडून टाकण्याची धमकी (Disconnection of Electricity Connection) देत असल्याने सामान्य जनतेचे कंबरडेच मोडून जाते.

जनतेस सहकार्य करण्याऐवजी संबंधित अधिकारी हे उर्मटपणे व मुजोरीने वागत असल्याने व कोणतेही सहकार्य करीत नसल्याने सामान्य जनतेस कित्येक पटीने आलेले असे बेकायदा व चुकीचे वीजबिल भरण्यावाचून पर्यायच राहत नाही व त्याविरोधात वीज कायदा २००३ कायद्याची तरतूदच माहित नसल्याने निमूटपणे बील भरून अन्याय सहन करतात अथवा संबंधित अधिकारींकडे कित्येक हेलपाटे मारून विनंती करून कंपनीच्याच चुकीने आलेले बील काही प्रकरणांत माफ करून घेतात.

कित्येक ग्राहकांना हे माहित नाही की विद्युत अधिनियम २००३ (The Electricity Act 2003) अंतर्गत अवाजवी बिलाविरोधात ग्राहकाने मागील ६ महिन्यांपासून आलेल्या वीजबिलाची सरासरी रक्कम भरल्यास वीज कंपनीस वीजजोड बंद करता येत नाही. याबाबत चुकीचे अथवा अवाजवी वीजबिलाविरोधात  विद्युत अधिनियम २००३ (The Electricity Act 2003) मध्ये तरतूद करण्यात आली असून सदर कायद्याच्या इंग्रजीची फाईल लिंक खालीलप्रमाणे आहे-
The Electricity Act 2003 Marathi.Pdf

हा लेख आपण आमच्या युट्युब चॅनलवर व्हिडियो स्वरूपातही पाहू शकता किंवा खालील उर्वरित लेख वाचावा

या कायद्यातील कलम ५६ व त्यातील परंतुक खालीलप्रमाणे आहे-

विद्युत अधिनियम २००३- चुकीच्या वीजबिलाविरोधात ६ महिन्यांचे सरासरी बील भरण्याचा अधिकार
विद्युत अधिनियम २००३- चुकीच्या वीजबिलाविरोधात ६ महिन्यांचे सरासरी बील भरण्याचा अधिकार

आता वर नमूद केलेप्रमाणे कलम ५६ व त्यातील परंतुकानुसार खालील निष्कर्ष निघतो-
एक म्हणजे १५ दिवसांची पूर्वसूचना दिल्याशिवाय वीजजोड अथवा कनेक्शन थकीत बील असले तरीही कापता येणार नाही आणि दुसरे म्हणजे जर संबंधित ग्राहकाने विरोध दर्शवून पूर्ण शुल्क भरले अथवा (सर्वात महत्वाचे) मागील ६ महिन्यांपासून आलेल्या बिलाची सरासरी रक्कम जर विरोध दर्शवून भरली तर वाद चालू असेपर्यंत असे कनेक्शन संबंधित वीज कंपनीस कापता अथवा बंद करता येणार नाही.

म्हणजेच खाजगी अथवा सरकारी, देशभरातील कोणत्याही वीज ग्राहकास जर चुकीचे अथवा अवाजवी बिल आले असल्याची खात्री पटल्यास ते बील न भरता त्याऐवजी मागील ६ महिन्यांच्या आलेल्या बिलाची सरासरी रक्कम विरोध दर्शवून भरण्याचा ग्राहकास अधिकार आहे तसेच सदर वाद प्रलंबित असेपर्यंत संबंधित वीज कंपनी हे वीजजोड अथवा कनेक्शन बंद करू शकणार नाही हे वरील कायद्यातील तरतुदीनुसार स्पष्ट आहे.

तरी यापुढे भ्रष्ट व अकार्यक्षम वीज कंपनीमुळे चुकीचे अथवा अवाजवी बील आल्यास अजिबात घाबरू नका. वर नमूद केलेल्या कायदेशीर तरतुदीचा वापर करा आणि नेटाने लढा द्या.
जरूर वाचा-
विद्युत अधिनियम २००३- थकीत बिलासाठीही कनेक्शन तोडण्यापूर्वी १५ दिवसांची लेखी पूर्वसूचना बंधनकारक

हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेअर करा, खाली दिलेले आमचे विविध फेसबुक व ट्विटर खातेंवर ‘Like’ व  ‘Follow’ करा, फेसबुक पेजला ‘Like’ केल्यानंतर सुद्धा पेजवरील ‘Follow’ बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कुठलेही यापुढील लेख जाहीर केले तर त्याचे थेट अपडेट आपणास भेटतील.
संघटनेचे फेसबुक पेज लिंक-
https://www.facebook.com/jaihindbks

ट्विटर पेजचे लिंक-
https://twitter.com/jaihindbks
तसेच या पेजवर आपला ई मेल टाकून करावा, जेणेकरून या वेबसाईटवरील प्रत्येक लेख हा थेट आपल्या ई-मेल वर प्राप्त होईल, जयहिंद!
-ॲड.सिद्धार्थशंकर अ. शर्मा
(संस्थापक, अध्यक्ष, भारतीय क्रांतिकारी संघटना)

सूचना- कायदा हे वेळोवेळी बदलत असतो कित्येक वेळा न्यायालये ते रद्दही करत असतात, वर नमूद माहिती ही राज्य शासनाच्या वेबसाईटवरील माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी याबाबत कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा व अद्ययावत माहिती घ्यावी, अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.


Share

Leave a Reply