मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे
मराठी कायदे मार्गदर्शन

मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे

Share

मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे, आदेश डाऊनलोड करणे- (How to check Causelist, Case Status Court Orders & Judgments, Case Details & Date of Bombay High Court, Marathi)- कित्येक नागरिकांना वेळोवेळी वर्तमानपत्रात मुंबई उच्च न्यायालयाने विविध आदेश दिल्याचे वाचण्यात येते. कित्येक आदेश हे नागरिकांच्या अगदी जिव्हाळ्याचे विषय असतात आणि काही तर थेट जीविताशी संबंधितही असतात. अशा वेळी असे आदेश प्राप्त करण्याची नागरिकांची इच्छा असते मात्र ते केवळ वकीलच करू शकतात व प्रत्येक वेळी केवळ वकिलांवरच अवलंबून राहावे लागते अशी चुकीची धारणा करून बसतात. उलट सामान्य  जनतेने थोडा वेळ न्यायालयीन आदेश व प्रक्रिया समजून घेण्यास समर्पित केल्यास ते क्रांतिकारी बदल घडवू शकतात असे आमचे प्रामाणिक मत आहे. परिणामी मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख व पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे, आदेश डाऊनलोड करणे याबाबत माहिती या लेखात दिली आहे.

कित्येक मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामध्ये तर मंत्रालय, शासकीय विभाग, तथाकथित मोठे नेते व अधिकारी यांच्या विरोधातही आदेश अथवा मुंबई उच्च न्यायालयाने कारवाई अथवा ताशेरे ओढल्याचे वाचण्यात येते. तसेच कित्येक नागरिक हे स्वतः मुंबई उच्च न्यायालयात पक्षकार असतात मग अशा वेळी अशा याचिका अथवा केसमध्ये आदेश, निर्णय कसे पाहावेत, याचिका अथवा केसची पुढील तारीख कशी पहावी हे माहित नसल्याने न्यायालयीन निर्णय अथवा कामकाज याबद्दल कमालीची सांशकता असते.

तसेच कित्येक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत सरकारकडून हेतुपरस्पर कोर्टाच्या निर्देशानुसार उत्तर दाखल न करणे, चाल-ढकल करणे, कार्यवाही करणेबाबत उशीर करणे आणि कित्येक दोषी अधिकारी, नेते अथवा कंपन्या यांना वाचविण्यासाठी अशा प्रकरणांत ‘तारीख पे तारीख’ चा खेळ कसा चालेल हे कट कारस्थानाद्वारे कुरापती करणे असे प्रकार केले जातात. न्यायालय हे आधीच प्रचंड ओझ्याखाली असल्याने त्याकडूनही प्रत्येक प्रकरणांत लक्ष देणे अशक्य असते. अशा वेळेस नागरिकांना जर कामकाज ऑनलाईन समजले आणि देखरेख करू लागले तर नक्कीच भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध मोठा बदल घडेल या रणनीतीने हा लेख जाहीर करण्यात येत आहे.

मुंबई उच्च न्यायालयातील याचिका/केस यांची सद्यस्थिती, आदेश व निर्णय कसे पहावे?
सर्वप्रथम मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करावे, त्याची लिंक खालीलप्रमाणे आहे-
https://bombayhighcourt.nic.in
त्यानंतर खालीलप्रमाणे पेज उघडले जाईल-

मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे
मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे

त्यानंतर याचिकेची सद्यस्थिती बघण्यासाठी ‘Case Status’ या बटनवर क्लिक करा (लाल रंगाने अधोरेखित भाग बघा)-‘Case Status’ वर क्लिक केलेनंतर खालीलप्रमाणे पेज उघडले जाईल-

मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे
मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे

त्यानंतर आपणास ४ अतिरिक्त बटन दिसतील ते खालीलप्रमाणे-
Case Number Wise,
Advocate Name Wise,
Party Wise,
CIN Number Wise.

यातील ३ प्रवर्गाची माहिती आपण घेणार आहोत-
१) ‘Case Number Wise’ अथवा  याचिका/केस क्रमांक पाहून सद्यस्थिती, आदेश अथवा निर्णय पाहणे-
हा प्रवर्ग ज्यांच्या स्वतःच्या याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित अथवा निकाली निघाल्या आहेत अशा लोकांसाठी आहे. यामध्ये व्यक्तीस मुंबई उच्च न्यायालयातील स्वतःचा केस/याचिका क्रमांक माहित असतो. आता समजा आपल्या वकिलांनी केस याचिकेचा क्रमांक WP/5761/2010 असा सांगितला आहे. तरी वर नमूद केलेप्रमाणे ‘Case Number Wise’ या बटन वर क्लिक केलेनंतर खालीलप्रमाणे पेज उघडले जाईल-

मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे
मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे

अत्यंत महत्वाचे- हा सर्वात महत्वाचा भाग असून वाचकांनी हा भाग काळजीपूर्वक समजून घेतल्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रत्येक केस अथवा याचिकेची माहिती घेणे खूप सोपे होईल. सर्वप्रथम Bench हे बटन बघा ते खंडपीठासाठी आहे. मुंबई उच्च न्यायालयाची ३ खंडपीठे आहेत, मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद. आता याचिकेच्या क्रमांकाबरोबर आपली याचिका कोणत्या खंडपीठात येथे हे माहित असणे स्वाभाविक आहे.

आता वर दिलेला याचिका क्रमांक WP/5761/2010 हे मी पुण्याच्या आय.एल.एस.विधी महाविद्यालायाविरोधात कायद्याचा विद्यार्थी असताना केलेल्या उपोषणानंतर तत्कालीन पुणे विद्यापीठाकडून विधी महाविद्यालयाची चौकशी सुरु करण्यात आली होती त्यास विधी महाविद्यालयाने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते मात्र ती याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्या याचिकेची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम  पुणे विभाग हा मुंबई खंडपीठात येत असल्याने मी Bench हे मुंबई (वेबसाईट नुसार ‘Bombay’) निवडेन.

त्यानंतर पुढील बटन येते ते ‘Side’ चे. आता सदर रिट याचिका ही सिविल असल्याने तिथे ‘Civil’ हे निवडण्यात येईल. जर याचिका ही मुंबई भागातील असेल तर मात्र सिविल याचिका असली तरी मुंबई उच्च न्यायालायचे मूळ अधिकारक्षेत्र म्हणून Original निवडावे. मात्र वर नमूद प्रकरण हे पुण्याचे म्हणजेच मुंबईबाहेरील असल्याने केवळ ‘Civil’ निवडत आहे.

त्यानंतर पुढील भाग येतो तो Stamp/Regn या बटनचा. हा भागही महत्वाचा पण अत्यंत साधा आहे. बऱ्याच वेळा कोर्टामध्ये दाखल केलेल्या याचिकेमध्ये वकिलांकडून अथवा याचिकाकर्त्यांकडून काही तांत्रिक चुका होतात जसे की याचिकेत जोडलेले झेरॉक्स हे काळपट असणे ई. त्यावेळेस याचिकाकर्त्यास अथवा वकिलांस ती  त्रुटी दूर करण्यास अवधी दिला जातो मात्र तोपर्यंत गंभीर विषयाच्या याचिकेत नुकसान होऊ नये म्हणून याचिकेस तात्पुरता क्रमांक दिला जातो.

जेव्हा याचिकेत कोणतीही त्रुटी नसते तेव्हा याचिकेस ‘Registration Number’ भेटतो व जेव्हा याचिकेत काही त्रुटी बाकी असतील तेव्हा त्यास ‘Stamp’ क्रमांक भेटतो. आता वरील याचिकेत काही तांत्रिक त्रुटी नसल्याने व त्यास ‘Registration Number’ भेटला असल्याने मी ‘Register’ निवडेन. त्यामुळे आपल्याला मिळालेली याचिका नोंद ही ‘Stamp’ आहे की ‘Registration Number’ भेटलेली आहे हे जरूर तपासावे. तसेच वर नमूद केलेप्रमाणे मुंबईमधील याचिका असल्यास Original निवडण्यास विसरू नये.

त्यापुढील भाग येतो तो Type म्हणून. याचिका अथवा केसचा प्रकार काय आहे ते नमूद करणे इथे अपेक्षित आहे. वर नमूद याचिका क्रमांकमध्ये WP म्हणजेच Writ Petition अर्थ असल्याने Civil Writ Petition हे बटन क्लिक केले आहे. (हेच मुंबई उच्च न्यायालयाचे जर Original अधिकारक्षेत्र असते तर Writ Petition(OS) असे बटन दिसेल). वरीलप्रमाणे सर्व माहिती योग्यप्रकारे भरल्यानंतर ‘Search By Case No’ हे बटन क्लिक केले की खालीलप्रमाणे वर नमूद याचिकेचे तपशील पेज उघडले जाईल.

मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे
मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे

यामध्ये याचिका म्हणजेच त्यावर निर्णय होऊन याचिका अंतिम स्तरावर येऊन निकाली काढण्यात आली आहे असे दिसत आहे. तसेच न्यायालयाने याचिकेवर काय निर्णय दिला हे पाहण्यासाठी ‘Listing Dates/Orders’ या बटनवर क्लिक केल्यास त्यानंतर न्यायालयाने आतापर्यंत या याचिकेत दिलेले सर्व आदेश दिसतील ती आपण पीडीएफ स्वरूपात थेट डाउनलोड करू शकता. याचिका निकाली काढण्यात आल्याने पुढील तारीख उपलब्ध नाही अन्यथा प्रलंबित प्रकरणांत पुढील तारीख ही ‘Next Date’ स्वरुपात दिसते.

२) Party Wise अथवा पक्षकाराचे नाव टाकून याचिकेचे आदेश, निर्णय अथवा सद्यस्थिती पाहणे-
भाग अ-
अधिकारी, नेते अथवा सामाजिक कार्यकर्ते यांच्याबाबतच्या याचिकेसंबंधी-

कित्येक वेळा आपल्या वाचण्यात अथवा ऐकण्यात मोठे नेते, अधिकारी अथवा काही सामाजिक कार्यकर्ते ई. संबंधी याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाकडून महत्वाचे आदेश देण्यात आल्याची माहिती भेटते. अशा वेळेस पक्षकाराचे नाव टाकूनसुद्धा संबंधित याचिकेची माहिती प्राप्त करता येते. वर नमूद केलेप्रमाणे Party Wise या बटनवर क्लिक केलेनंतर खालीलप्रमाणे पेज उघडले जाईल-

Hc 4
वर नमूद केलेप्रमाणे BenchJurisdiction ई. माहिती भरलेनंतर Party Name अथवा पक्षकाराचे नाव टाकावे आणि त्यानंतर सदर व्यक्ती अथवा संस्था हे याचिकाकर्ते (Petitioner) आहे की प्रतिवादी (Respondent) ही माहिती भरावी. त्यानंतर ज्या वर्षी आपणास याचिका दाखल झाली असल्याची माहिती आहे  Filing Year निवडावे व Submit बटनवर क्लिक केल्यानंतर आपण ज्या व्यक्तीचे नाव टाकले आहे त्यासंबंधी सर्व याचिका उघडले जातील व त्यानुसार आपण प्रत्येक याचिका उघडून संबंधित आदेश, निर्णय ई. प्राप्त करू शकता.

उदाहरणार्थ आपणास सन २०१९ मध्ये राज्यात किती शाळांच्या विरोधात याचिका दाखल झाल्या अथवा कसे याची माहिती हवी असल्यास Party Name मध्ये School आणि प्रतिवादी म्हणजेच Respondent अशी माहिती दाखल केल्यास सर्व शाळांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल सर्व प्रकारच्या याचिकांची सद्यस्थिती, आदेश व निर्णय ई. माहिती खालीलप्रमाणे त्वरित प्राप्त करता येईल.

मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे
मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे

भाग ब-
शासकीय विभाग, मंत्रालय, राजकीय नेते व अधिकारी यांबाबत-
इतकेच नाही तर आपणास ‘Ministry’, ‘Home’, ‘Education’, ‘Police’ ई. शब्द वापरून शासनाच्या महत्वाच्या विभागांना पक्षकारमध्ये नाव टाकून त्यांचेविरोधात किती याचिका दाखल झाल्या आहेत व त्याबद्दल न्यायालयाने काय आदेश दिले आहेत हे सुद्धा जनता दरवर्षीप्रमाणे पाहू शकते. कित्येक याचिकांमध्ये न्यायालयाने शासनास प्रतिज्ञापत्र अथवा जबाब दाखल करण्याचे आदेश दिलेले असते मात्र शासनाचे संबंधित विभाग ते हेतुपरस्पर दाखल करीत नाहीत याबाबत सामान्य जनता माहिती अधिकराद्वारे तर पत्रकार बांधव आपल्या लेखणीद्वारे समाजात जागरूकता आणून मोठा क्रांतिकारी बदल घडवू शकतात.

२) Advocate Name Wise अथवा वकिलांचे नाव टाकून याचिकेचे आदेश, निर्णय अथवा सद्यस्थिती पाहणे-
कित्येक वेळा पक्षकाराचे नाव टाकूनही माहिती मिळत नाही अशा वेळेस वर्तमानपत्र अथवा माहितीद्वारे प्राप्त झालेल्या वकिलांचे नाव टाकल्यास माहिती प्राप्त करता येऊ शकते. वर नमूद केलेप्रमाणे केवळ वकिलांचे नाव टाकल्यास त्या वकिलांच्या नावाने जितक्या याचिका आजतागायत दाखल झाले असतील त्या सर्वांची यादी समोर येते आणि त्यानुसार आपणास हवे असलेल्या याचिकेची माहिती प्राप्त होऊ शकते.

मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे
मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे

भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध कायद्याने कसे लढावे याबाबत आमच्या अत्यंत महत्वाच्या लेखांची एकत्रित मालिका वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
https://wp.me/P9WJa1-MV

हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेअर करा, खाली दिलेले आमचे विविध फेसबुक व ट्विटर खातेंवर ‘Like’ व  ‘Follow’ करा, फेसबुक पेजला ‘Like’ केल्यानंतर सुद्धा पेजवरील ‘Follow’ बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कुठलेही यापुढील लेख जाहीर केले तर त्याचे थेट अपडेट आपणास भेटतील.
संघटनेचे फेसबुक पेज लिंक-
https://www.facebook.com/jaihindbks

ट्विटर पेजचे लिंक-
https://twitter.com/jaihindbks
तसेच या पेजवर आपला ई मेल टाकून करावा, जेणेकरून या वेबसाईटवरील प्रत्येक लेख हा थेट आपल्या ई-मेल वर प्राप्त होईल, जयहिंद!


Share

3 thoughts on “मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे”

  1. आपले काम खूपच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी खूपच प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक आहे.

  2. आपल्या या शब्दांबद्दल मनःपूर्वक आभार उद्धवजी, सामान्य जनतेस कायद्याचे शिक्षण दिल्यास मोठी क्रांती सहज होईल असा आम्हाला विश्वास आहे.

  3. उशिरा संपर्काबद्दल क्षमस्व, आपले हे प्रोत्साहनरुपी शब्द आम्हाला हे कार्य अविरत चालू ठेवण्यास खूप प्रेरणा देतात…धन्यवाद !

Leave a Reply