संघटनेच्या निदर्शनास राज्य शासनाने माहिती अधिकार अर्जासाठी ऑनलाईन अर्जासाठी निर्धारित केलेल्या दराहून प्रत्येक माहिती अधिकार अर्जामागे रु.५.९०/- इतकी म्हणजेच सुमारे ५९% अतिरिक्त रक्कमेची वसुली व लूट करीत असल्याचे संघटनेच्या निदर्शनास आले आहे.
महाराष्ट्र शासनाने नागरिकांना सोयीचे व्हावे म्हणून राज्य सरकारतर्फे ऑनलाईन माहिती अधिकार अर्ज दाखल करण्यासाठी वेबसाईट सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याची लिंक खालीलप्रमाणे आहे-
https://rtionline.maharashtra.gov.in/index-e.php
तसेच या वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज कसा दाखल करावा याबाबत संघटनेतर्फे लेखही जाहीर करण्यात आलेला आहे तो खालीलप्रमाणे-
माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत ऑनलाईन माहिती अर्ज व प्रथम अपील करणेबाबत माहिती
माहिती अर्जासाठी कायद्याने निर्धारित केलेला दर-
राज्य शासनाच्या सन २०१२ च्या नियमावलीनुसार प्रत्येक माहिती अधिकार अर्जदारास रु.१०/- इतक्या रक्कमेची स्टँप, पोस्टल ऑर्डर अथवा डिमांड ड्राफ्ट देण्याचे दर ठरविण्यात आले आहे परिणामी माहिती अधिकार अर्जास कोणत्याही परिस्थितीत रु.१०/- हून अधिक रक्कम आकारता येणार नाही असे स्वतः शासन परिपत्रक स्पष्ट करते.
राज्य शासनाकडून प्रत्येक अर्जामागे रु.५/- इतकी पोर्टल फी व रु.०.९०/- इतका जीएसटी कर-
वर नमूद केलेप्रमाणे माहिती अधिकार वेबसाईटवर सामान्य जनतेने माहिती अधिकार अर्जासाठी अर्ज केल्यानंतर त्यांना दारिद्र्यरेषेवरील अर्जदारास रु.१०/- इतक्या रक्कमेवर प्रत्येक अर्जामागे रु.५/- इतकी पोर्टल फी व रु.०.९०/- असे एकूण रु.५.९०/- अतिरिक्त शुल्क घेतले जाते. म्हणजेच एक माहिती अधिकार अर्जाचा दर हा ऑनलाईन प्रक्रियेद्वारे रु.१५.९०/- इतका ठेवण्यात आलेला आहे.
परिणामी राज्य सरकार स्वतःच्याच नियमांची अहवेलना करीत असल्याचे सिद्ध झाले आहे.
‘आपले सरकार’ तक्रार निवारण पोर्टल अपयशी.
तक्रारीनंतर आपले सरकार तक्रार निवारण पोर्टल ‘कार्यान्वित’, तक्रारदारांना नुकसान भरपाई.

*भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध कायद्याने कसे लढावे याबाबत आमच्या अत्यंत महत्वाच्या लेखांची एकत्रित मालिका वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
https://wp.me/P9WJa1-MV
इतर बाजू-
संघटनेतर्फे कधीही एकांगी लेख जाहीर करण्यात येत नाही. एक वेळेस सरकारने उपलब्ध करून दिलेल्या स्तुत्य उपक्रमाची दुसरी बाजू पहिली तरीही राज्य शासन नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात लुट करीत असल्याचेच सिद्ध होईल. कारण या वेबसाइटद्वारे विशेष अशी कोणतीही यंत्रणा राबविण्यात आली नसून केवळ अर्ज स्वीकारणे आणि ते संबंधित अधिकाऱ्यांना ऑनलाईन प्रक्रियेद्वारा अग्रेषित करण्यात येते हे स्पष्ट आहे. कोणत्याही वेबसाईट डिझायनरला जर विचारले असता एकदा का सॉफ्टवेअरमध्ये सर्व संबंधित अधिकाऱ्यांची ई-मेल व विभागाचे नाव रक्षित केल्यानंतर त्यांना आपोआप सदर अर्ज अग्रेषित केला जाऊ शकतो मात्र एकदा ही यंत्रणा राबवली गेल्यानंतर त्याचा विशेष असा खर्च होताना दिसत नसल्याचे आमचे मत आहे.
सर्वोच्च न्यायालय- निर्धारित शुल्कापेक्षा अतिरिक्त फीवसुली व मुलांना शाळेतून काढता येणार नाही.
मानसिक छळ व पालकांना खोटी माहिती देण्यास दबाव – सरस्वती मंदिर शाळेच्या माजी प्राचार्यांचा धक्कादायक खुलासा
केंद्र व राज्य शासनाच्या याच स्वरूपाच्या इतर वेबसाईट मोफत-
इतकेच नाही तर या यंत्रणेपेक्षा कित्येक पटीने अधिक ताण असलेले खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आपले सरकार तक्रार निवारण पोर्टल हे संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार पाठवते, तक्रारीची सद्यस्थिती दाखवणे, टोल फ्री क्रमांकाद्वारे माहिती देणे, नोडल अधिकारीशी संपर्क आणि वेळोवेळी त्यावर करण्यात आलेल्या कारवाईचा तपशील देत असते आणि नागरिकांना ते पूर्णतः मोफत आहे. केंद्र सरकारचेही माहिती अधिकार पोर्टल रु.१०/- पेक्षा अतिरिक्त शुल्क आकारात नाही. मात्र असे असूनही राज्य शासनाने केवळ माहिती अधिकार विभागाच्या वेबसाईटला निर्धारित दरापेक्षा ५९% अधिक दर लागू केला आहे.
शेकडो कोटींची मलई व लुट?
थोडे गणिती भाषेत सांगायचे झाले तर समजा १० लाख लोकांनी प्रत्येकी एक असे माहिती अर्ज एका वर्षात दाखल केले असतील तर १० लाख अर्जांमागे रु.५.९०/- इतके शुल्क हणजेच सुमारे रु.५९,००,०००/- इतके उत्पन्न राज्य शासनास भेटत असेल. म्हणजेच प्रत्येक अर्जासाठी रु.१०/- ही कायद्याने निर्धारित फीद्वारे रु.१,००,००,०००/- (एक कोटी रुपये) व्यतिरिक्त सुमारे रु.५९,००,०००/- इतके उत्पन्न राज्य शासनास भेटत असेल.
वेबसाईट व सॉफ्टवेअरचा दरवर्षीचा खर्च हा तर या कमाईसमोर नगण्य असणार आहे. हे वेबसाईट राज्य शासनातर्फे वर्षानुवर्षे कार्यान्वित केली असल्याने आतापर्यंत शासनास कोट्यावधी रुपये केवळ पोर्टल फी च्या नावाखाली प्राप्त झाले असणार आहेत. परिणामी राज्य शासनाकडून माहिती अधिकार अर्जदारांची मोठी लुट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. संघटनेतर्फे याबाबत पुढील कायदेशीर कारवाई अथवा जन जागृती अभियानाद्वारे ही लुट थांबविण्याचे पूर्ण प्रयत्न करण्यात येणार आहेत.
भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध कायद्याने कसे लढावे याबाबत आमच्या अत्यंत महत्वाच्या लेखांची एकत्रित मालिका वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
https://wp.me/P9WJa1-MV
हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेअर करा, खाली दिलेले आमचे विविध फेसबुक व ट्विटर खातेंवर ‘Like’ व ‘Follow’ करा, फेसबुक पेजला ‘Like’ केल्यानंतर सुद्धा पेजवरील ‘Follow’ बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कुठलेही यापुढील लेख जाहीर केले तर त्याचे थेट अपडेट आपणास भेटतील.
संघटनेचे फेसबुक पेज लिंक-
https://www.facebook.com/jaihindbks
ट्विटर पेजचे लिंक-
https://twitter.com/jaihindbks
तसेच या पेजवर आपला ई मेल टाकून करावा, जेणेकरून या वेबसाईटवरील प्रत्येक लेख हा थेट आपल्या ई-मेल वर प्राप्त होईल, जयहिंद!