पुण्यात स्तन कर्करोग विरोधात सामाजिक संघटनांकडून मोफत मॅमोग्राफी तपासणी व जनजागृती अभियान
मराठी न्यूज

पुण्यात स्तन कर्करोग विरोधात सामाजिक संघटनांकडून मोफत मॅमोग्राफी तपासणी व जनजागृती अभियान

Share

वुमन टीव्ही (Woman TV), प्रशांती कँसर केअर मिशन आणि ऑर्किड ब्रेस्ट हेल्थ सेंटर यांच्या सौजन्याने पुण्यामध्ये महिलांसाठी स्तन कर्करोग (Breast Cancer) संदर्भात जनजागृती तसेच महिलांमध्ये स्तन कर्करोग (Breast Cancer) बाबत मोफत वैद्यकीय तसेच मोफत मॅमोग्राफी तपासणी करण्यात येणार असून याबाबत मोठे अभियान जाहीर करण्यात आलेले आहे.

या अभियानाबाबत अधिक माहिती देताना वुमन टीव्हीच्या संचालिका श्रीमती श्वेता सक्सेना यांनी सांगितले की ‘मुळात स्तन कर्करोग (Breast Cancer) ला बेस्ट कँसर (Best Cancer) सुद्धा संबोधले जाते कारण त्याचे निदान त्वरित झाल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणून आमच्या या अभियानामध्ये #MyBreastFriend (माय ब्रेस्ट फ्रेंड) या टॅगलाईन नुसार महिलांना स्तन कर्करोग (Breast Cancer) बाबत जनजागृती व्हावी म्हणून मैत्रिपूर्ण वातावरणात त्यांना याबाबतची माहिती देण्यात येणार आहे.’

‘स्तन कर्करोग (Breast Cancer) वेळीच तपासला गेल्यास नंतर होणारे भयानक परिणाम टाळता येतात व तो पूर्णतः बरा होऊ शकतो. मात्र कित्येक वेळा विनाकारण संकोच व सामाजिक परिस्थितीमुळे महिला वेळीच याबाबत तपासणी करीत नसल्याने त्याचे अत्यंत भयानक परिणाम होतात. म्हणून यासाठीची मोफत वैद्यकीय तपासणी तसेच मोफत मॅमोग्राफी तपासणी या अभियानाद्वारे आम्ही करणार आहोत’.

‘याबाबत श्रीमती लालेह बुशेरी (संचालिका ऑर्किड ब्रेस्ट हेल्थ सेंटर आणि प्रशांती कॅन्सर केअर मिशन) तसेच सुप्रसिद्ध डॉक्टर आनंद कोपीकर यांच्याद्वारे गरजू व अर्थिकदृष्टया कमकूवत महिलांना मोफत तपासणी व मॅमोग्राफी सारखी महागडी तपासणी मोफत देण्यात येणार आहे.’

मोफत वैद्यकीय तसेच मोफत मॅमोग्राफी तपासणीसाठी नोंदणी-
सदर टेस्ट मोफत प्राप्त करण्यासाठी महिलांनी +919579166436 या व्होट्सएप क्रमांकावर नोंदणी करून त्यानंतर ऑर्किड ब्रेस्ट हेल्थ सेंटर (पत्ता-१,२, कपिलवास्तू, सेनापती बापट रोड, पुणे) येथे WOMANTV03 या कोडद्वारे नोंदणी करायची आहे.

इतकेच नाही तर या अभियानाद्वारे ज्या महिलांमध्ये याबाबत सकारात्मक बदल घडला तसेच जनजागृतीमुळे त्यांना झालेला फायदा याबाबत व्हिडिओ डॉक्युमेंटरी सुद्धा तयार करण्यात येणार असल्याचे श्रीमती श्वेता सक्सेना यांनी सांगितले असून या अभियानात आतापर्यंत सहा.पोलीस आयुक्त नीलम जाधव, श्रीमती श्वेता अरोरा, श्रीमती रचना पाटील, श्रीमती गौरी-ढोले पाटील, श्रीमती रेशू अगरवाल, श्रीमती बॉबी करणानी, श्रीमती देवांगिनी आणि श्रीमती सोनिया पाटील अशा समाजातील प्रतिष्ठित महिलांचाही पाठिंबा भेटल्याने ही चळवळ परिणामकारक होत असल्याचे श्रीमती श्वेता सक्सेना यांनी सांगितले आहे.

या अभियानाची व्हिडिओ द्वारे माहिती आपण खालील युट्युब लिंक तसेच वुमन टीव्हीच्या फेसबुक पेज द्वारे ही घेऊ शकता तरी या अभियानाचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
अभियानाची फेसबुक लिंक- Woman TV Official
अभियानाबाबतचा विडीयो- My Breast Friend Campaign by Woman TV


Share

Leave a Reply