शिवशाही बस दंडात्मक कारवाई महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
मराठी न्यूज

वकिलाच्या तक्रारीनंतर प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या शिवशाही बसवर दंडात्मक कारवाईचे आदेश

Share

वकिलाच्या तक्रारीनंतर प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या शिवशाही बसवर दंडात्मक कारवाईचे आदेश-राज्यभरात अपघात आणि नित्कृष्ट सेवा यासाठीच चर्चेत असणाऱ्या शिवशाही बस संदर्भात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) विभागाने आपले सरकार तक्रार निवारण पोर्टलवरील तक्रारीची दखल घेऊन संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ऐन लोणावळा घाटाच्या आधी स्टेअरिंग तुटल्यानंतर  प्रवाशांना शिवशाहीच्या एसी बसमधून थेट साध्या एसटी बसमध्ये प्रवास करण्यास भाग पाडणे आणि त्यातही काही प्रवाशांना उभ्यानेच पुण्यापर्यंत उर्वरित प्रवास करावयास लावणे याबाबत संघटनेतर्फे प्रवाशांवरील अन्यायास बातमी जाहीर करून वाचाही फोडण्यात आली होती. त्या बातमीची लिंक खालीलप्रमाणे आहे-
शिवशाही बसकडून परत प्रवाशांचा जीव धोक्यात, लोणावळा घाटाजवळ स्टेरिंग तुटले

या प्रवासात ॲड.सिद्धार्थशंकर शर्मा यांनाही त्रास झाला होता. त्याविरोधात मुख्यमंत्र्यांच्या आपले सरकार तक्रार निवारण पोर्टलद्वारेही तक्रार करण्यात आली होती. तसेच संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करणे आणि शास्तीच्या कारवाईबाबतही नोटीस देण्यात आली होती.

अखेरीस या तक्रारीची दखल घेऊन संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्यामध्ये सदर शिवशाही बस ही मे.एरॉन कंपनीची असून त्यात बिघाड झाल्याची बाब कबुल करून दंडात्मक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. सदर आदेश हा खालीलप्रमाणे आहे-

वकिलाच्या तक्रारीनंतर प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या शिवशाही बस संदर्भात कारवाईचे आदेश
वकिलाच्या तक्रारीनंतर प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या शिवशाही बसवर दंडात्मक कारवाईचे आदेश

जनतेने बेजबाबदार परिवहन खातेविरुद्ध कशी कारवाई करावी-
वर नमूद केल्याप्रमाणे संघटनेतर्फे या विषयी कारवाई करावी लागणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. या प्रकरणात बस खराब झाल्याचे फोटो तसेच तत्काळ तक्रार अशा दोन्ही कार्यवाही तातडीने करण्यात आल्या होत्या. तसेच कारवाई न केल्यास तत्काळ फौजदारी कारवाई तसेच संबंधित अधिकारींच्या विरोधात कारवाई करण्यासाठी योग्य ती तयारी करण्यात आली होती.

जनतेने अशा प्रकारांच्याविरोधात लढण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात-
१) बस खराब असणे ई. बाबतचे फोटो/विडीयो पुरावे शक्य असेल तर काढून ठेवणे.
२) संबंधित त्रुटींविरोधात तत्काळ व न चुकता ई-मेल अथवा संबंधित विभागास पत्राद्वारे तक्रार करणे किंवा आपले सरकार तक्रार निवारण पोर्टलद्वाराही तत्काळ तक्रार दाखल करणे,
३) याबाबत संबंधित वाहनाच्या देखरेखीची जबाबदारी असणाऱ्या अधिकारींकडून माहिती अधिकार कायद्यांतर्गत  वाहनाच्या दुरुस्तीची व इतर कामांची माहिती मागविणे,
४) नुकसान भरपाईसाठी ग्राहक न्यायालयास तक्रार करणे (जे या प्रकरणातही लवकरच कार्यवाही करण्यात येणार आहे).

संघटनेतर्फे याबाबत आपले सरकार तक्रार प्रणालीचे आभार मानीत आहोत. या पोर्टलचा आतापर्यंतचा संघटनेचा अनुभव हा संमिश्र आहे, त्याबाबत दोन्ही लेखांची लिंक देत आहोत-
तक्रारीनंतर आपले सरकार तक्रार निवारण पोर्टल ‘कार्यान्वित’, तक्रारदारांना नुकसान भरपाई
‘आपले सरकार’ तक्रार निवारण पोर्टल अपयशी

त्यामुळे आपले सरकार पोर्टलद्वारा कारवाई न झाल्यास तक्रारदाराने त्यानंतर विविध न्यायालय व आयोग येथे कारवाई करावी. जनतेने संबंधित अधिकारींवर कायद्याने कशी कारवाई करावी? फौजदारी कारवाई कशी करावी? याबाबत आम्ही जाहीर केलेले खालील पेजवरील लेख आवर्जून वाचावेत त्याची लिंक खालीलप्रमाणे आहे-
न्यायालय, आयोग, पोलीस व अधिकारी ई. कडे तक्रार अर्ज नमुना तसेच विविध कायद्यांबाबत माहिती व मार्गदर्शन
लोकसेवक अथवा शासकीय कर्मचारीवर फौजदारी गुन्हा दाखल करणेसंबंधी कायदे व न्यायालयीन निर्णय
फौजदारी तक्रारीनंतर एफआयआर FIR कशी करावी याबाबत कायदा, तरतुदी व मार्गदर्शन
महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९- महत्वाच्या तरतुदी

*भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध कायद्याने कसे लढावे याबाबत आमच्या अत्यंत महत्वाच्या लेखांची एकत्रित मालिका वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
https://wp.me/P9WJa1-MV

हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेअर करा, खाली दिलेले आमचे विविध फेसबुक व ट्विटर खातेंवर ‘Like’ व  ‘Follow’ करा, फेसबुक पेजला ‘Like’ केल्यानंतर सुद्धा पेजवरील ‘Follow’ बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कुठलेही यापुढील लेख जाहीर केले तर त्याचे थेट अपडेट आपणास भेटतील.तसेच या पेजवर आपला ई मेल टाकून Subscribe करा, जेणेकरून या वेबसाईटवरील प्रत्येक इंग्रजी, हिंदी व मराठीतील लेख हे थेट आपल्या ई-मेल वर प्राप्त होईल, जयहिंद!
संघटनेचे फेसबुक पेज लिंक-
https://www.facebook.com/jaihindbks

ट्विटर पेजचे लिंक-
https://twitter.com/jaihindbks


Share

Leave a Reply