वेबसाईटने पैसे कमवून देणाऱ्या Website Monetizing Networks ची माहिती
मराठी टीप्स

वेबसाईटने पैसे कमवून देणाऱ्या Website Monetizing Networks ची माहिती

Share

वेबसाईटने पैसे कमवून देणाऱ्या Website Monetizing Networks ची माहिती- (Information of Website Monetizing Networks)-
कित्येक वेबसाईटचे लेखक हे आपल्या वेबसाईटवर अनेक लेख अथवा ब्लॉग लिहित असतात. असे लेख अथवा कंटेंट हे काही वेळेस हजारो तर काही लाखोंच्या संखेने पाहिले जातात. मात्र असे असले तरी कित्येक अशा वेबसाईट जाहिरातीद्वारे पैसे कमविण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्यांच्या वेबसाईटद्वारे ते पैसेही कमवू शकतात ही बाब खूप कमी लोकांना माहित असते किंवा माहित असली तरी ती कशी कमवावी व त्यासाठी कोणत्या अधिकृत वेबसाईट आहेत (Website Monetizing Networks)  याबाबत कल्पना नसल्याने ते आपल्या वेबसाईटद्वारे पैसे कमविण्याचा भाग सोडून देतात आणि त्यातून त्यांचे आर्थिक उत्पन बुडते.

परिणामी आज आपण अशा विश्वासार्ह Website Monetizing Networks ची माहिती घेणार आहोत जे आपल्या वेबसाईटला विशेषतः भारतीय वेबसाईटना चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकतात. त्यांची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे-

१) Google AdSense-
Google AdSense हे कोणत्याही भारतीय अथवा जगातील वेबसाईटना आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी क्रमांक १ ची पसंती असते.  Google कडून Google Adsense या त्यांच्या वेबसाईटवर जाहिराती दाखविणाऱ्या विभागाकडून कोणत्याही वेबसाईटला मान्यता (Approval)  भेटणे हे वेबसाईटसाठी एक प्रतिष्ठेची बाब असते. Google AdSense कडून वेबसाईटला मान्यता मिळाल्यास आपल्या वेबसाईटवर Google कडून जाहिराती दाखविल्या जातात व त्यातून आपल्या वेबसाईटला चांगले उत्पन्न मिळते.

आपण अद्याप आपली वेबसाईट जाहीर केली नसल्यास आमचा खालील लेख जरूर वाचवा व कोणत्याही प्रोग्रामरच्या मदतीशिवाय स्वतःची वेबसाईट कशी काढावी याची माहिती घ्यावी-
वेबसाईट कशी बनवावी? WordPress वर Programmer च्या मदतीशिवाय वेबसाईट बनविणेबाबत मार्गदर्शिका

Google Adsense कडून मान्यता तसेच काही महत्वाच्या बाबी-

१) आपला कंटेंट चांगला असेल (अभ्यासू लेख, दुसऱ्या वेबसाईटवरून न चोरलेले लेख, अश्लीलता नसलेले लेख ई.)  व आपल्या वेबसाईटला चांगला Traffic असेल तर Google AdSense हे आपली वेबसाईट Approve करते. एक लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे खूप Traffic नसेल अगदी दिवसा १००-२०० चा User Traffic असेल तरीही वर नमूद केल्याप्रमाणे कंटेंट चांगला असेल तर Google AdSense कडून आपल्या वेबसाईट ला मान्यता भेटू शकते.
२) प्रक्रिया-
Google AdSense ला अर्ज केल्यानंतर (खाली लिंक दिली आहे) Google  तर्फे आपणास एक Website Code देण्यात येतो तो आपल्या वेबसाईटच्या Admin Panel मध्ये जाऊन Header Footer Section मध्ये टाकल्यानंतर जर वेबसाईटला Approval भेटले तर आपल्या वेबसाईट वर Google कडून जाहिराती दाखविण्यास सुरुवात होते.
३) वर नमूद केल्याप्रमाणे Google Adsense कडून Approval भेटल्यानंतरही Google आपल्या नावाचे ओळखपत्र व आपण दिलेल्या पत्त्यावर PIN पाठवते ते आपण अपलोड केल्यानंतर आपले अकाऊंट पूर्णतः Approve केले जाते. ओळखपत्रासाठी आधार कार्ड Google कडून मान्य केले जात नाही परंतु पासपोर्ट, ड्रायविंग लायसेन्स ई. ची Scan केलेली प्रत Google ला अपलोड करावी लागते.
Google Adsense ला अर्ज करण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा-
Google AdSense Signup

वर नमूद केल्याप्रमाणे Google AdSense कडून Approval मिळविणे हे खूप अवघड आहे. मात्र आजकाल Google Adsense कडून मराठी व हिंदी वेबसाईटना सुद्धा चांगला कंटेंट असेल तर मान्यता देण्यात येत आहे. तरी Google Adsense कडून मान्यता न भेटल्यास खालील Website Monetizing Networks ला सुद्धा आपण अर्ज करून आपल्या वेबसाईटवर जाहिराती दाखवू शकता व चांगली रक्कम कमवू शकता.

२) Infolinks-
Google Adsense प्रमाणे Infolinks हे सुद्धा Website Monetizing Network असून तूर्तास ते मराठी वेबसाईटला मान्यता देत नाही परिणामी ते इंग्रजी वेबसाईटनाच मान्यता देतात, किंवा इंग्रजी व मराठी संमिश्र वेबसाईटना मान्यता Infolinks कडून दिली जाते.. तसेच एकदा का या वेबसाईटला अर्ज केला व त्यानंतर त्यांचे Code हे वेबसाईटला मान्य झाले तर Infolinks च्या Admin Panel मध्ये आपण केवळ कोणत्या प्रकारच्या जाहिराती आपल्या वेबसाईट वर दाखवायच्या आहेत असे Option निवडले की आपल्या वेबसाईटवर Infolinks च्या जाहिराती दाखविण्यास सुरुवात होते. Infolinks द्वारे In Text, In Fold, In Tag & In Frame अशा प्रकारच्या जाहिराती दाखविण्यात येतात. आपणास Approval भेटल्यानंतर Infolinks हे आपणास स्वतः या जाहिराती आपल्या वेबसाईटवर कशा दिसतील याचे प्रात्यक्षिक दाखवते. Infolinks ला अर्ज करण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा-
Infolinks Signup

३) Adgebra-
ज्यांना चांगली Traffic असूनही Google Adsense ची मान्यता भेटत नाही त्यासाठी Adgebra अतिशय उपयुक्त ठरते. स्थानिक राज्यातील भाषेनुसार जाहिराती दाखविणारे अत्यंत उपयोगी असलेल्या Adgebra ही Website Monetizing Network कंपनी Approval भेटल्यानंतर अतिशय सोप्या पद्धतीने जाहिराती दाखविण्यास सुरु करते. यामध्ये वेबसाईट मालक हे स्वतः कोणत्या पद्धतीची जाहिरात Banner स्वरुपात दाखवायची याचा निर्णय घेतात.

राज्यातील कित्येक वृत्तवाहिन्या या Adgebra द्वारे जाहिराती दाखवितात. अर्थातच Adgebra ला अर्ज करणे हे इतर Website Monetizing Network च्या दृष्टीने थोडे क्लिष्ट आहे कारण Adgebra कडून रद्द केलेले चेक व अनेक तपशील द्यावे लागतात. मात्र एकदा त्या सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या व Adgebra कडून मान्यता भेटली तर मात्र त्यानंतरची प्रक्रिया ही अत्यंत सोपी असून केवळ विविध Banner चे कोड आपल्या वेबसाईट मध्ये टाकणे व जाहिरात दाखविणे सोपे होऊन जाते.
Banner ला अर्ज करण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा-
Adgebra Signup

४) RevenueHits-
RevenueHits ही सुद्धा जाहिरात मिळवून देण्यासाठी एक महत्वाचे Website Monetizing Network असून चांगली बाब म्हणजे यासाठी Approval ची गरज नसून वेबसाईटमध्ये RevenueHits ने दिलेला Code टाकला कि त्यानंतर आपण थेट Admin Panel मध्ये जाऊन आपल्याला हवा तो जाहिरात प्रकाराचा कोड घेऊन आपण आपल्या वेबसाईटमध्ये टाकू शकता. इथे एक महत्वाची बाब म्हणजे RevenueHits हे जाहिराती दाखविण्यासाठी पैसे देत नाही. तर आपली जाहिरातीवर कुणी क्लिक केले व त्यापुढे कार्यवाही झाली तर मात्र RevenueHits अतिशय चांगली रक्कम देते.

RevenueHits हे १० वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती दाखवते. त्यामध्ये महत्वाचे म्हणजे Banner, Pop Under, Mobile Interstitial या जाहिरात प्रकारांचा समावेश होतो. RevenueHits चे Banner जाहिराती या केवळ ‘Download’ असे जाहिराती दर्शवितात. त्यामुळे ते करमणूकीच्या वेबसाईटसाठीच उपयुक्त आहेत. RevenueHits चे Mobile Interstitial जाहिराती मात्र अत्यंत चांगल्या असून त्या प्रत्येक वेबसाईटना त्या उपयुक्त ठरू शकतात.

तसेच RevenueHits द्वारे Pop Under जाहीरातीचाही प्रकार देण्यात आला आहे. Pop Under जाहिरात म्हणजे आपल्या वेबसाईटवर कुणी Visit दिली आणि त्याने Screen वर कोठेही क्लिक केले किंवा आपला लेख वाचताना Screen Touch केले तर RevenueHits आपोआप त्याला नवीन जाहिरात पेजवर घेऊन जाते व आपणास त्यासाठी चांगले पैसे भेटतात. बऱ्याच करमणुकीच्या वेबसाईटमध्ये आपण हा प्रकार पहिला असेल.

मात्र Pop Under प्रकाराने क्लिक्स व चांगले पैसे भेटत असले तरी आपल्या वेबसाईट Visitor ला खराब अनुभव आल्याने तो पुन्हा आपल्या वेबसाईटवर येण्याचे टाळू शकतो. त्यामुळे अशी जाहिरात केवळ करमणुकीच्या वेबसाईटना परवडते. अर्थातच त्यामुळे RevenueHits मधील Mobile Interstitial ही जाहिरात आपल्या वेबसाईटला टाकलेली चांगली. मात्र Pop Under जाहिरात सुद्धा चांगली कमाई मिळवून देत असल्याने याबाबतचा निर्णय वेबसाईटच्या मालकाने घ्यावयाचा आहे.
RevenueHits ला अर्ज करण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा-
RevenueHits Signup

(एक अत्यंत महत्वाची बाब RevenueHits जरी Adult Content दाखवत नाही असे लेखी देत असले तरी RevenueHits ची जाहिरात आपल्या वेबसाईटवर टाकताना त्यांना आधीच ई-मेल द्वारे Adult Content माझ्या वेबसाईटवर दाखवू नये अशी ई-मेल द्वारे सूचना जरूर करावी. काही Users च्या अनुभवाने त्यांना RevenueHits कडून चुकून Adult Content आल्याचे निदर्शनास आणले आहेत. मात्र असा ई मेल केल्यानंतर RevenueHits  टीम कडून आपली वेबसाईट फिल्टर Filter केली जाते व Adult Content दाखविले जात नाहीत. त्यामुळे खात्रीचा उपाय म्हणून असा ई-मेल आधीच केलेला कधीही उपयुक्त.

Affiliate Marketing-
वरील Website Monetizing Network हे जाहिराती दाखविण्याचे अथवा त्यावर क्लिक केल्यास वेबसाईटच्या मालकास पैसे कमवून देतात. त्यामुळे खूप Traffic असेल तर त्यातून चांगली कमाई होऊ शकते. मात्र आपल्या वेबसाईटवर जाहिरात करण्याचा अजून एक प्रकार म्हणजे Affiliate Marketing. यामध्ये आपल्या वेबसाईटवर अगदी १० Users नी Visit दिली व आपल्या वेबसाईट वरील जाहिरातीचे Product खरेदी केले तर त्यातून आपणास चांगले कमिशन  मिळते व याउलट हजारो Users नी Visit दिली मात्र काहीच खरेदी केले नाही तर कोणतीही कमाई होत नाही. यालाच Affiliate Marketing असे म्हणतात. यातील काही महत्वाच्या Website Monetizing Network पाहूयात.

५) Cuelinks-
Cuelinks हे  Affiliate Marketing Website Monetizing Network असून त्यासाठी आपला अर्ज थेट Approve करण्यात येतो व आपल्या वेबसाईटवर थेट जाहिराती दाखविता येतात. Cuelinks  द्वारा Amazon, Flipkart, MakeMyTrip अशा अनेक नामांकित कंपन्यांच्या जाहिराती थेट आपल्या वेबसाईटवर दाखवता येतात. Cuelinks- चे एक विशेष Feature म्हणजे म्हणजे Deal Box व Coupon Box जे एकदा पण वेबसाईटवर टाकले की आपल्याला त्यापुढे काहीच करायची गरज नाही, Cuelinks स्वतः या बॉक्समध्ये जाहिराती व चांगले Product दाखवत असते. उदाहरणसाठी Coupon Box खालीलप्रमाणे-

Cuelinks- हे त्यांना जाहिरातदार कंपनीकडून मिळणाऱ्या कमिशनमधून आपणास ७५% कमिशन व २५%. रक्कम स्वतः ठेवते. Cuelinks कडे Amazon, Flipkart, Jabong, Myntra, Swiggy, McDonals, Dominoz  अशा अनेक नामवंत कंपन्या या कोणत्याही अटीशिवाय त्यांच्या जाहिराती आपणास उपलब्ध करून देतात त्यामुळे Cuelinks द्वारे भारतीय वेबसाईटना मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Cuelinks ला अर्ज करण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा-
Cuelinks Signup

६) Amazon Affiliate Marketing-
Amazon कंपनी सुद्धा आपले Product हे Affiliate Marketing द्वारे उपलब्ध करून देत असते. आपण कंपनीस अर्ज केला की आपण Amazon कंपनीचे Products आपल्या वेबसाईटवर जाहिरात म्हणून दाखवू शकता. मात्र एक बाब लक्षात घ्या, Amazon जाहिराती मध्ये भयंकर स्पर्धा असल्याने आपल्या वेबसाईटवरून ग्राहक ते Product विकत घेईलच असे नाही व Amazon चे रोज नवनवीन Product टाकले तरी त्याचे खरेदीमध्ये रुपांतर (Conversion) होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. आपण Amazon वेबसाईट Approval साठी खालील लिंकद्वारे अर्ज करू शकता-
Amazon Affiliate Signup

७) Commission Junction-
Commission Junction हे सुद्धा जागतिक दर्जाचे Affiliate Marketing Network असून आपण अर्ज केल्यानंतर कंपनीकडून आपल्या वेबसाईट Review केला जातो व त्यानंतरच वेबसाईटला मान्यता भेटते. त्यानंतर आपण विविध Product ची लिंक वापरून आपल्या वेबसाईटला जाहिरात करू शकता. इथे एक बाब लक्षात घेण्यासारखी ती म्हणजे Commission Junction ची जरी आपल्याला मान्यता भेटली तरी त्यातील कंपन्यांच्या जाहिराती दाखविण्यासाठी आपणास परत त्या कंपन्यांना अर्ज करावा लागतो व त्यांनी मान्यता दिल्यासच आपण त्यांचे प्रोडक्ट जाहिरातीसाठी आपल्या वेबसाईटवर दाखवू शकता.

तसेच कमिशन जंक्शन मध्ये विशेष करून विविध कोर्सेस व Computer Product & Services आणि विशेषतः अमेरिका व इतर देशातील युजर्ससाठी जास्त जाहिराती असून भारतीय कंपन्या तिथे तुलनेने खूप कमी आढळतात. त्यामुळे आपल्या वेबसाईटला बाहेरील देशांचे विशेषतः अमेरिकेचे Visitors असतील तर विविध कंपन्यांना अर्ज करून आपण विदेशी कंपन्यांच्या जाहिराती आपल्या वेबसाईटवर दाखवू शकता. Commission Junction ला आपण खालील लिंकद्वारे अर्ज करू शकता-
Commission Junction Signup

काही अत्यंत महत्वाच्या बाबी-
१) जाहिरात टाकली म्हणजे पैसे कमविण्यास सुरु होईल अशी अपेक्षा न ठेवलेली बरी. कारण हजारोंच्या संख्येने Visitors नसतील तर Google Adsense  पासून ते इतर Website Monetizing Network कंपन्यांकडून चांगली कमाई मिळणे कठीण असते.
२) Affiliate Marketing मध्ये बऱ्याच वेळा हजारो क्लिक भेटूनही त्याचे उत्पन्नात रूपांतरण Conversion होत नाही.
३) आपल्या वेबसाईटवर खूप जाहिराती करू नयेत त्याने वेबसाईटची Ranking खालावते.

४) Google Adsense ने जर मान्यता दिली असेल तर त्यासोबत चुकुनही Pop Under जाहिरात लावू नये अन्यथा  Google Adsense आपल्या वेबसाईटला बंदी करून पुन्हा जाहिरात देण्याची परवानगी देणार नाही व अशी बंदी ही कायमची असते. कित्येक वेबसाईट धारकांनी त्यांनी केलेल्या चुकांमुळे त्यांचे Google Adsense चे कायमचे उत्पन्नाचे स्त्रोत गमावले आहेत.
५) याचा अर्थ असा नाही की आपण Google Adsense बरोबर इतर Website Monetizing Network चे जाहिराती दाखवू शकत नाही. Google Adsense या कंपन्यांच्या जाहिराती या Cuelinks, Infolinks, Commission Junction, Amazon बरोबर Compatible आहेत मात्र तशी जाहिरात करण्यापूर्वी आपल्या Website Monetizing Network कडून पूर्ण माहिती घेतल्याशिवाय Google Adsense सोबत इतर कोणतीही जाहिरात टाकू नये.

५) कोणत्याही पद्धतीने जाहिरात देणाऱ्या कंपनीस फसवू नये. त्यांच्याकडे आपल्या जाहिराती व युजर्सबाबत अहोरात्र काम करणारी टीम काम करत असते व कोणत्याही वेबसाईटने काही चुकीचे प्रकार केल्यास त्यांनी कमावलेली रक्कम जप्त करणे व कायमची बंदी टाकणे अशी कारवाई करण्यात येते.
६) केवळ वेबसाईटवर जाहिरात टाकून त्यालाच कमाईचे साधन बनवू नये, वर सांगितल्याप्रमाणे वेबसाईटच्या जाहिरातीतून पैसे हे हजारो नियमित Visitors असतील तरच भेटतात व त्यासाठीही कित्येक प्रयोग करावे लागतात त्यामुळे संयमाने आपल्या वेबसाईटची गुणवत्ता वाढवावी व प्रामाणिकपणे नवनवीन प्रयोग करत राहावे. त्यास कालांतराने नक्कीच यश मिळते.


Share

Leave a Reply