वेबसाईट कशी बनवावी? WordPress वर Programmer च्या मदतीशिवाय वेबसाईट बनविणेबाबत मार्गदर्शिका
मराठी टीप्स

वेबसाईट कशी बनवावी? WordPress वर Programmer च्या मदतीशिवाय वेबसाईट बनविणेबाबत मार्गदर्शिका

Share

वेबसाईट कशी बनवावी? Programmer च्या मदतीशिवाय WordPress वर स्वतःची वेबसाईट बनविणेबाबत मार्गदर्शिका- (How to create website without help of the programmer on WordPress)-
आपल्यापैकी कित्येकांना स्वतःची वेबसाईट बनविण्याची इच्छा असते. त्यात व्यावसायिक कंपन्या, विविध  फर्मपासून  ते कला अथवा विज्ञान क्षेत्रातील अभ्यासक, डॉक्टर किंवा वकील यांनाही स्वतःचे ज्ञान ब्लॉगद्वारे अथवा कंटेंटद्वारे  जगासमोर मांडण्याची इच्छा असते. पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या अथवा कित्येक पत्रकारांनाही स्वतःचे न्यूज चॅनेल काढण्याची इच्छा असते. परंतु वेबसाईट बनविणे म्हणजे Programmer अथवा सॉफ्टवेअर इंजिनिअरची आवश्यकता लागेल या विचाराने तसेच प्रत्येक वेळेस वेबसाईटमध्ये काही बदल करावयाचा असल्यास Programmer ला संपर्क करणे व इतर औपचारिकता करावी लागेल व सारखे त्यासाठी पैसे मोजावे लागतील ई. बाबी बघून अनेक लोक हे इच्छा असूनही स्वतःची वेबसाईट जाहीर करत नाहीत.

परिणामी बऱ्याच वेळा लोक आपले मत अथवा ज्ञान केवळ सोशल मिडियावर व्यक्त करण्यापुरते मर्यादित ठेवतात. मात्र सोशल मिडियावरील लेख हे कॉपीराईटचे संरक्षण देत नाहीत. तसेच ते गुगल सर्चवर सुद्धा क्वचितच उपलब्ध होतात. इतकेच नाही तर आपण लिहिलेल्या लेखावर अथवा आपल्या कलागुणांना वेबसाईटवर जाहीर केल्यानंतर त्यात पैसे कमविण्याच्याही मोठ्या संधी आहेत ही बाबही खूप कमी लोकांना माहित आहे किंवा माहित असली तरी ते कसे कमवावे हे माहित नसते.

मात्र कोणत्याही Programmer च्या मदतीशिवाय वेबसाईट बनविणे सहज शक्य आहे. जगातील ३०% हून अधिक वेबसाईटना संचालित करणाऱ्या WordPress या कंपनीद्वारे हे शक्य आहे. म्हणजेच आपण पाहत असलेल्या जगातील प्रत्येक ३ वेबसाईटपैकी १ वेबसाईट ही WordPress कडून संचालित केलेली आहे. जास्तीत जास्त अभ्यासकांनी वेबसाईटद्वारे व्यक्त व्हावे, विशेषतः ज्यांच्याकडे कलागुण आहेत, जगाला काही सांगायची इच्छा आहे व सामान्य जनतेस मदत करायची इच्छा आहे त्यांनी स्वतःची वेबसाईट जरूर जाहीर करावी व ती कोणत्याही Programmer कडून मदत न घेता स्वतः कशी बनविता येईल या कारणास्तव ही मार्गदर्शिका जाहीर करीत आहोत.
आपली स्वतःच वेबसाईट असेल तर जरूर वाचा-
वेबसाईटने पैसे कमवून देणाऱ्या Website Monetizing Networks ची माहिती

Programmer शिवाय काही मिनिटांत वेबसाईट बनविण्याची सुविधा (Making Website Without the Help of Programmer)-
सामान्यतः Programmer हे Domain एका कंपनीकडून घेतात, Hosting एका कंपनीकडून, त्यानंतर Php Code, HTML Code इतर अनेक कोड वापरून वेबसाईट बनवली जाते, Website Theme मध्ये सुद्धा काही बदल करायचे असतील, अगदी वेबसाईटच्या शब्दांचा आकार लहान मोठा करणे, हेडरला लोगो ई.साठी सुद्धा Coding करावे लागते. त्यामुळे सामान्य व्यक्तीला स्वतः वेबसाईट बनविणे केवळ अशक्य आहे किंवा त्यासाठी कित्येक महिने Coding शिकायची गरज लागेल. परंतु हीच गरज ओळखून WordPress ने Domain, Hosting ई. सर्व एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिले असून सामान्य व्यक्तीही अगदी न्यूज चॅनेलही काही मिनिटांत बनवू शकेल इतके प्रोग्रामिंग सोपे करून टाकले आहे.

WordPress.com आणि WordPress.org मधील फरक- (Difference between the WordPress.com & WordPress.org)- 
इथे एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे की WordPress.com आणि WordPress.org या दोन्ही कंपन्या WordPress कंपनीच्याच असून ज्यांना Coding येत नाही त्यांच्यासाठी WordPress.com सर्वात सोपी आहे तर WordPress.org मध्ये Coding ज्ञान असणे आवश्यक आहे. परिणामी आपण WordPress.com च्या वेबसाईट बनविण्याच्या प्लॅन्स आणि इतर बाबी या लेखात पाहणार आहोत.

वेबसाईट व सोशल मिडियामधील फरक (Difference between Website & Social Media)-
वेबसाईट हे Google Search वर ठळकपणे दिसून येतात तर सोशल मिडीयाच्या पोस्ट या क्वचितच Google Search वर दिसतात. वेबसाईट हे आपले मजकूर कंटेंट आपोआप कॉपीराईट (Copyright) करते तर याउलट सोशल मिडियावरील लेखावर हे कॉपीराईट (Copyright) संरक्षण मिळत नाही. आपल्या लेखास Google तसेच इतर Search Engine वर चांगली रँकिंग भेटल्यास व आपण आपल्या वेबसाईटमध्ये जाहिरात (Monetized Advertisement) टाकली असल्यास त्यातून हजारो तर कधी लाखो रुपयांची कमाई होऊ शकते. अर्थातच अशी चांगली रँकिंग प्राप्त करण्यासाठी आपणास आपला कंटेंट मजबूत ठेवावा लागतो आणि काही वेळेस त्यास कित्येक महिन्यांची प्रतीक्षा करावी लागते. मात्र अशी कोणतीही कमाईची व्यवस्था सोशल मिडिया वेबसाईट देत नाहीत.

मोफत वेबसाईट आणि स्वतःची खरेदी केलेली वेबसाईट यातील फरक- (Difference between Free Website & Purchased Website)-
WordPress या प्लॅटफॉर्मवर आपणास मोफत वेबसाईटही काढता येते. मोफत वेबसाईट व पूर्णतः विकत घेतलेली स्वतःची वेबसाईट यामधील फरक जाणून घेऊयात-
१) मोफत वेबसाईटला Domain Name हे पूर्णतः स्वतःचे भेटत नाही त्यापुढे कंपनीचे नाव लागते.
उदा.आपणास http://www.abc.com असे नाव हवे असेल तर त्यासाठी आपणास असे Domain Name विकत घ्यावे लागेल मात्र याच नावाचे आपण मोफत वेबसाईट WordPress वर काढल्यास त्यास http://www.abc.wordPress.com असे नाव भेटते.

२) केवळ नावात वेबसाईट कंपनीचे नाव आल्याने काय झाले असे जर वाटत असेल तर एक महत्वाची बाब म्हणजे मोफत वेबसाईटमध्ये आपण स्वतः कोणतेही जाहिरात टाकू शकत नाही. म्हणजेच आपला लेख जरी लाखो लोकांनी वाचला तरी आपल्या वेबसाईटवर ज्या जाहिराती दाखवले जातील त्याचे पैसे हे WordPress कंपनी स्वतःकडे ठेवते.

३) कित्येक Themes तसेच Plugins हे आपण मोफत वेबसाईटमध्ये वापरू शकत नाहीत. उदा. आपणास या वेबसाईटवर खाली व्होट्सएप तसेच फेसबुक ट्विटरचे लेख शेअर करण्यासठी बटन दिसत आहेत, फेसबुक पेज दिसत आहे, हे सर्व आपण मोफत वेबसाईटमध्ये टाकू शकणार नाही.
४) आपण आपल्या वेबसाईटचे डिजाईन आपल्या मनानुसार ठेवू शकणार नाही, मोफत वेबसाईटसाठी अत्यंत साधे असे Basic Theme आपल्याला ठेवावे लागते.

थोडक्यात ज्यांना केवळ लेख लिहायचे आहेत व त्यातून कमाईची अपेक्षा नाही अथवा वेबसाईटवर विविध Plugins व Themes नको आहेत ते मोफत वेबसाईट काढू शकतात.
*(Plugins म्हणजे थोडक्यात आपल्या मोबाईलमध्ये आपण विविध Applications वापरतो ना, उदा. पीडीएफचे वर्ड मध्ये रूपांतरण करणे, फोटोना इफ्फेक्ट देणे ई. तेच काम वेबसाईटसाठी Plugins करतात)

मोफत व स्वतः घेतलेल्या विकतच्या वेबसाईटमधील महत्वाचे फरक जाणून घेतल्यानंतर आपण आता WordPress कंपनीकडून प्लॅन्स काय आहेत ते जाणून घेऊयात-
मोफतच्या व्यतिरिक्त WordPress कडून ३ प्लॅन्स जाहीर करण्यात आले आहेत ते म्हणजे-
1) Personal, 2) Premium & 3)Business Plans.
सध्याच्या घडीला WordPress कडून जाहीर ३ प्लॅन्सचे दर खालीलप्रमाणे आहेत-
Personal Plan (१ वर्षासाठी रु.२४००/-), Premium Plan (१ वर्षासाठी रु.४२००/-) आणि Business Plan (१ वर्षासाठी रु.९६००/-)
*(E-Commerce Plan सुद्धा कंपनीकडून अस्तित्वात असून मात्र तो अत्यंत मोठ्या E-Commerce कंपन्याना लागू असल्याने तूर्तास त्याबाबत उल्लेख टाळत आहोत).

या ३ ही प्रवार्गांचा फरक समजून घ्यायचा असेल तर खालील लिंकवर क्लिक करून आपण अद्ययावत माहिती प्राप्त करू शकता-
WordPress Plan Details & Comparison
(अत्यंत महत्वाचे- आपण आपली वेबसाईट सुरु केल्यास व आपणास ती न आवडल्यास आपण कंपनीस कळवून आपली सर्व रक्कम कंपनीने जाहीर केलेल्या मुदतीत (साधारणपणे ३० दिवसाच्या आत रद्द केल्यास) तत्काळ  परत घेऊ शकता व वेबसाईट रद्दही करू शकता!)

तरीही या ३ ही प्लॅन्समधील महत्वाचे फरक इथे थोडक्यात सांगायचे म्हणजे,
Personal Plan  आणि Premium  Plan हे बहुतांश सारखेच आहेत, Premium  Plan मध्ये केवळ 12GB स्टोरेज उपलब्ध असून ते पर्सनल प्लॅनमध्ये केवळ 6GB उपलब्ध आहे. Premium  Plan मध्ये अमर्यादित Themes देण्यात आले असून Personal Plan मध्ये मर्यादित Themes उपलब्ध आहेत. Personal Plan मध्ये आपणास WordPress कंपनीचे Video Press भेटत नाही ते Premium  Plan मध्ये भेटते त्यामुळे आपण Premium  Plan मध्ये विडियोही अपलोड करू शकता.

Business Plan-
Personal Plan  आणि Premium  Plan हे सामान्यतः मर्यादित फोटो व विडीयोचे सुविधा असलेले तसेच एक Basic Website जाहीर करण्यासाठी उपयुक्त आहेत. मात्र मोठ्या स्वरूपाच्या वेबसाईटसाठी उदा.बातम्या देणाऱ्या न्यूज चेनेल्स ई.साठी Personal Plan  आणि Premium  Plan चे स्टोरेज (Storage)  हे कमी पडतील. त्यासाठी WordPress चे Business Plan हे उपयुक्त आहे. मात्र केवळ स्टोरेज जास्त भेटते म्हणून Business Plan उपयुक्त आहे असे नाही तर Business Plan चे खालील अत्यंत महत्वाचे असे फायदे आहेत-

१)
आपणास हवे ते Plugins व Premium Theme हे या Business Plan मध्येच भेटते. उदाहरण द्यायचे झाल्यास काही राष्ट्रीय न्यूज चेनेल चे होमपेज सारखे लूकआउट असणारे Theme हे या Business Plan मध्ये मोफत भेटतात.
२) आपल्या वेबसाईटवर आपणास Plugins वापरून हवे त्या भागात, हवे त्या उताऱ्यानंतर आपणास हवी ती जाहिरात अथवा लिंक, कोड ई. टाकता येते. तसेच Personal Plan  आणि Premium  Plan मध्ये एकदा जाहिरात टाकली व काही दिवसानंतर ती संपली तर पुन्हा आपण जितके लेख अथवा बातम्या टाकल्या असतील तिथे प्रत्येक ठिकाणी जाऊन ती बदलावी लागते आणि परत नव्याने टाकावी लागते. Business Plan मध्ये मात्र Plugins द्वारे अगदी १००० लेख असतील तरीही त्यातील जाहिरीती एका क्लिक मध्ये बदलता येतात व अत्यंत क्लिष्ट असलेले हे काम काही सेकंदांत करता येते.

३) Business Plan चा अजून एक फायदा म्हणजे आपणास SEO (Search Engine Optimization) ची काळजी करण्याचे  कारण नाही. WordPress कंपनीमध्ये असलेली सिस्टीम स्वतः आपला कंटेंट SEO (Search Engine Optimization) साठी उपयुक्त होतील अशी सुविधा मिळवून देतात.

४) अत्यंत महत्वाचे म्हणजे WordPress च्या Business Plan मध्ये Jetpack अंतर्भूत असून आपल्या वेबसाईटला Hacking पासून रोखण्याची जबाबदारी स्वतः WordPress कंपनी घेते तसेच प्रत्येक वेळी आपल्या वेबसाईटचा Back Up सुद्धा WordPress कडून घेण्यात येतो त्यामुळे वेबसाईटवरील डेटा हा पूर्णतः सुरक्षित असल्याची ग्वाही खुद्द WordPress कंपनी या प्लॅनमध्ये देते.
५) इतकेच नाही तर WordPress कंपनी स्वतः कोणत्याही अटीशिवाय आपल्या वेबसाईट वर जाहिरात देण्याची Word Ads Monetization व्यवस्था करते आणि त्याची सर्व रक्कम ही आपणास कमाई म्हणून प्राप्त होते.

६) २४ तास कोणत्याही प्रकारच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी Programmer उपलब्ध-
अशा प्रोग्रामरना अगदी वेबसाईटच्या अक्षरांचा आकार कमी करा किंवा जास्त करा इथपासून ते सर्व प्रकारचे प्रश्न हे Business Plan घेतलेला ग्राहक विचारू शकतो व त्याचे तत्काळ निराकरण केले जाते. हे Programmer केवळ शंकांचे निराकरण करीत नाहीत तर आपणस हवी असलेली Setting, Coding ई. सुद्धा त्यांच्या पातळीवर ऑनलाईन पद्धतीने करून देण्याची सोय WordPress कंपनीने करून ठेवली आहे.

अशाप्रकारे एकदा का आपण वेबसाईट विकत घेतली की तत्काळ आपण त्यावर आपले लेख अथवा बातम्या टाकून काही क्षणांत आपले वेबसाईट जाहीर करू शकता. आपल्या वेबसाईटला अथवा आपल्या लेखांना Google तसेच इतर Search Engine कडून चांगली रँकिंग भेटली की आपल्या वेबसाईटकडून आपण चांगल्या कमाईचीही अपेक्षा ठेऊ शकता. देशातील काही ब्लॉगर्सनी आपल्या स्वतःच्या कौशल्याने वर्षातच लाखो रुपये कमाविले आहेत. एकंदरीत कोणत्याही प्रोग्रामरशिवाय तुलनेने अत्यंत रास्त दारात पूर्णतः स्वतःचे नियंत्रण असलेले प्लॅटफॉर्म WordPress आपणास उपलब्ध करून देत असते.

स्वतःची कंपनी असो, आपले कलागुण असोत किंवा लोकांना मोफत ज्ञानदान करण्याचे काम असो व त्यातून पैसे कमाविण्याचीही संधी असल्याने तुलनेने केवळ आपल्या बौद्धिक क्षमतेवर अवलंबून असलेला व अत्यंत कमी गुंतवणूक असलेला हा पर्याय एकदा तपासून घेण्यास नक्कीच वाव आहे.
WordPress वर आजपासूनच आपली वेबसाईट सुरु करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
WordPress Website Sign Up
(अत्यंत महत्वाचे- आपण आपली वेबसाईट सुरु केल्यास व आपणास ती न आवडल्यास आपण कंपनीस कळवून आपली सर्व रक्कम कंपनीने जाहीर केलेल्या मुदतीत (साधारणपाने ३० दिवसाच्या आत रद्द केल्यास) तत्काळ  परत घेऊ शकता व वेबसाईट रद्दही करू शकता!)


Share

Leave a Reply