मराठी न्यूज

कोरोना ‘अनलॉक’नंतर पुण्यात्यील न्यायालयाचा ज्येष्ठ वकिलांचा पहिला अनुभव

Share

८ जूननंतर पुण्यातील न्यायालयीन कामकाज सुरु झाले, पहिल्या दिवशीचा विदारक अनुभव उघडकीस आणणारी पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड.मिलिंद पवार यांची पोस्ट-
‘नमस्कार मित्रांनो..
८ जुन, #कोर्ट चालू होणार अशा बातम्या आल्या म्हणून आज 18 मार्च नंतर पहिल्यांदाच न्यायालयाच्या गेट नंबर ४ पर्यंत गेलो पण #तुफान गर्दी पाहून गुमान ऑफिसमध्ये येऊन बसलो. आरोपी एक व त्याचे समर्थक किमान ५०/६० अशी नेहमीचीच अवस्था होती. सर्व #गुंड टाईपचे लोक पचापच रसत्यावर इतरत्र थुकंत होते. पण त्यांना कोणीच काही बोलत नव्हते. गेटवर #कमीटीचे पदाधिकारीच लोकांना गेटवर अडविण्यासाठीची मोठी रिस्क घेऊन खिंड लढवत होते. कोणाला कोणाचेच काही देणे घेणे नव्हते असे #एकंदरीत वातावरण होते. ती गर्दी पाहिल्यावर असे वाटत होते की काही लोक कोरोना द्यायला आलेत तर काही घरी घेऊन जायला आलेत. ती परिस्थीती पाहिल्यावर आवाक झालो व व्हेकेशन/लॉकडाऊन नंतरचा व कोर्टाचा पहिल्या दिवसाचा #उत्साहच मावळला.

त्या गर्दीचाच विचार करत होतो तेवढ्यात हडपसरच्या दुय्यम #निबंधक कार्यालयतील आपले वकील बंधू व त्यांचे क्लार्क यांना प्रॉब्लेम झाला. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना शोधण्यासाठीचे काम सुरू झाले ही बातमी कळाली. मेगा सेंटर हडपसरचे दुय्यम निबंधकाचे कार्यालयही सील केले असेही समजले. पण एकंदरीतच सर्व #भयावह व अफरातफरीचे वातावरण दिसले.

मार्च महिन्यात जी व्यवस्था करण्यात आली होती तशीच दिसत आहे. कामकाजाच्या फक्त दोन #शिप्ट केल्या एवढा बदल दिसतोय. सुनावणी होणारच नाही असे दिसतेय. न्यायाधीश रोज नवीन #चार्ज प्रमाणे बसणार. त्यामुळे रोजचे नवीन न्यायधीश #इनचार्ज_कोर्ट काम करतीलच असे नाही. त्यामुळे तसे अजून प्रॉपर रूटिनचे कोर्ट सुरू झाले नाहीच असे म्हणायला वाव आहे.

आपले बरेच #वकील सहज म्हणून आलेले दिसले ते बरोबर नाही. कोणावर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती आहे. एखादा #उडाणटप्पू बाहेर गेला व तिकडेच धारातिर्थ पडला तर समजू शकतो पण तो ते कोरोनाचे युध्द स्वतःच्या घरात घेऊन येतो हे वाईट आहे. जनतेला एव्हाना हे सर्व समलय पण अजूनही #बेफीकीरीनेच वागतात हे पाहून वाईट वाटले.

एकंदरीत सर्व संभ्रम अवस्था आहे. काय कधी होईल सांगता हे येणार नाही अशी परिस्थिती आहे. कोरोना कधी संपुष्टात येईल, त्यावर कधी #औषध येईल, कोर्ट नियमित नेहमी प्रमाणे कधी सुरू होईल, आपल्या मनातील #भीती कधी व कशी कमी होईल हे आपले #चीफ_जस्टीस सोडा ब्रम्ह देवही सांगू शकत नाही अशी परिस्थिती आहे. पण एक प्रयत्न म्हणून न्यायालये सुरू करण्याचा प्रयत्न न्यायालयीन प्रशासनचा दिसतोय.

आता आपले वकील बांधव, #न्यायमुर्ती, #न्यायालयीन_कर्मचारी, यांच्या पर्यंत जर कोरोना पोहचत असेल तर हा फक्त #अनलाॅक चा परिणाम आहे असे मला वाटते. म्हणून आपल्याला अधिकची काळजी घ्यावी लागेल किंबहुना आपण काळजी घेतोय. निदान सध्यातरी अती-अती महत्वाचे काम असेल तरच कोर्टात गेलेले बरे, नाहीतर आपण अडीच महिने घरात बसून काढले किंबहुना कोरोनाशी युध्द लढले व त्यावर पाणी टाकल्या सारखे होईल.

म्हणून मित्रांनो थोडा संयम ठेवा, फार महत्वाचे असेल तरच कोर्टात जा, जावे तर लागेलच हेही बरोबर पण कोर्ट #परिसरातून लगेच बाहेर पडा. विनाकारण दोन महिने घरात बसून कंटाळा आला आहे म्हणून तर अजिबात जाऊ नका. गर्दीत तर अजिबात थांबू नका, कितीही जवळचा #मित्र, पक्षकार, आप्तेषट, #पोलीस यांच्याशी विनाकारण बोलत बसू नका. संसर्ग वाढतो आहे दिवसाला 2 ते अडीच हजार पेशंट वाढत आहेत व कोरोनाचा धोका व विळखा वाढतोच आहे हि वस्तुस्थिती आहे.

भविष्यात व लवकरात लवकर जर पून्हा पूर्वी सारखे #आनंदाचे दिवस पहायचे असतील तर आत्ता संयम महत्वाचा आहे. फक्त संयम तूटू देऊ नका, मोह टाळा, काही दिवसात परिस्थिती पूर्ववत होऊ शकते. पण नाही पाळले तर आहे ती सर्व व्यवस्थाही बंद करण्याची वेळ येईल.

तुम्हाला हे सर्व समजतय. मी फार शहाणा व मलाच सर्व समजत असं नाही पण कोणीतरी अशी जाणीव करून दिली की काही गोष्टी लक्षात येतात व #गांभीर्य कळते व आपण आपली काळजी घेतो. अनेक मित्रांनी, काही जेष्ठ वकीलांनी सबंध महाराष्ट्रातून फोन करून मला लिहायला प्रोत्साहीत केले व आपल्या जुजबी लिहण्याने जर काही सकारात्मक फरक पडत असेल व जनजागृती होत असेल तर का लिहू नये म्हणून हा लिखाण प्रपंच.

तेव्हा मित्रांनो #आवश्यक असेल तर कोर्टात जा, मोह टाळा, शेवटी हे कोरोनाचे अस्माणी संकट आहे. सरकार किंवा कोणी न्यायाधिश तुमच्या घरी येऊन सांगणार नाही की घरी थांबा. आपणच आपला योग्य निर्णय घ्यायचा व त्याची अंमलबजावणी करायची.

“!! ठेविले #अनंते तैसेची रहावे, चित्ती असो द्यावे समाधान !!”

हरिओम!!धन्यवाद..’


Share

Leave a Reply