आठ राज्यांच्या पालकांची शाळांच्या शुल्क निश्चिती, शुल्क माफी व ऑनलाईन शिक्षणासंबंधी सर्वोच्च न्यायालयात याचिका
मराठी न्यूज

आठ राज्यांच्या पालकांची शाळांच्या शुल्क निश्चिती, शुल्क माफी व ऑनलाईन शिक्षणासंबंधी सर्वोच्च न्यायालयात याचिका  

Share

आठ राज्यांच्या पालकांची शाळांच्या शुल्क निश्चिती, शुल्क माफी व ऑनलाईन शिक्षणासंबंधी सर्वोच्च न्यायालयात याचिका- कोरोनामुळे शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउन दरम्यान शाळा बंद असल्याने तसेच यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी गतवर्षीच्या तुलनेत अत्यल्प खर्च होणार असल्याने फी माफी करावी, कोरोनाचा धोका असेपर्यंत शाळेत नियमित वर्ग सुरु करू नये, तसेच ऑनलाईन शिक्षणासंबंधी बालकांवरील असलेले धोके ई. बाबत महाराष्ट्रासहित देशभराच्या आठ राज्यांच्या पालकांनी एकत्रित येऊन सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका (डायरी क्रमांक १३३६६/२०२०)केली आहे.

या याचिकेत प्रामुख्याने खालील मुद्द्यांचा समावेश आहे-
१) लॉकडाउन दरम्यान शाळा बंद असल्याने त्या काळातील शालेय शुल्क माफ करावे,
२) शुल्कवसुलीसाठी मुलांना शाळेतून बडतर्फ करू  नये,
३) कोरोनावर प्रभावी लस अथवा उपाय आल्याशिवाय तसेच कोरोना साथ बालकांसाठी जीवघेणा नाही असे वैद्यकीयरित्या जाहीर झाल्याशिवाय ऑफलाईन अथवा प्रत्यक्ष शाळा सुरु करण्यात येऊ नये,

४) ऑनलाईन शाळासंबंधी विद्यार्थ्यांना डोळ्यावरील ताण, पाठदुखी, तसेच सायबर क्राईम, लैंगिक अत्याचार, खंडणी ई गुन्ह्यांपासून संरक्षण प्राप्त होईल अशा उपाययोजना केल्याशिवाय व त्यासाठी शासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर केल्याशिवाय ऑनलाईन वर्ग चालू करू नयेत,
५) या वर्षी फी वाढ न करता मागील वर्षाची फी घेण्याची परवानगी देण्यापेक्षा या वर्षी शाळांचा जो खर्च होईल त्यानुसारच पालकांकडून शुल्क घेण्याचे निर्देश द्यावेत,

या याचिकेत महाराष्ट्रातून श्री.प्रसाद तुळसकर, श्री.राजेश बडनखे, श्री.संजय जोशी यांच्यासोबत श्री.सुशील शर्मा (राजस्थान), डॉ.गगन राउत (ओडिशा), श्री.वरूण खन्ना (पंजाब), श्री.गौरव बरोत (गुजरात), श्री.कैलाश चंद (हरियाणा) ,श्री.आरिफ खान (उत्तराखंड), श्री.अतुल रहेजा (दिल्ली) अशा विविध राज्यातील पालकांनी एकत्रित येऊन याचिका दाखल केली आहे.

आता मराठी कायदे मार्गदर्शन विडीयोद्वारेही, आमचे YouTube चॅनेल जरूर Subscribe करा!


Share

Leave a Reply