महाविद्यालयातील प्रवेश अर्जासाठी शुल्क निश्चितीबाबतचा नियम व प्रवेश प्रक्रियेबाबत तक्रार प्रणाली
मराठी कायदे मार्गदर्शन

महाविद्यालयातील प्रवेश अर्जासाठी शुल्क निश्चितीबाबतचा नियम व प्रवेश प्रक्रियेबाबत तक्रार प्रणाली

Share

महाविद्यालयातील प्रवेश अर्जासाठी शुल्क निश्चितीबाबतचा नियम व प्रवेश प्रक्रियेबाबत तक्रार प्रणाली-
राज्यभरात कित्येक विद्यार्थी त्यांच्यासाठी स्वतः अथवा पालकांमार्फत दरवर्षी अनेक महाविद्यालयात प्रवेशासाठी अर्ज करतात. अशा वेळेस महाविद्यालय त्यांच्याकडून प्रवेशासाठी प्रवेश अर्जासहित माहिती प्रवेश पुस्तिका (Prospectus with Admission Form) घेणे बंधनकारक करतात आणि त्यासाठी अगदी हजारोंच्या पटीत रक्कम वसूल केली जाते.

लॉकडाऊनमध्ये तर नुकतेच एका महाविद्यालयाने प्रवेशासाठी प्रवेश अर्जासहित माहिती प्रवेश पुस्तिका (Prospectus with Admission Form) पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून त्यासाठी शेकडो रुपये वसूल केल्याची घटना एका तक्रारदार पालकाने संघटनेच्या निदर्शनास आणून दिली. परिणामी वरिष्ठ महाविद्यालयात जिथे केंद्रीय पद्धतीने प्रवेश देण्यात येतो अशा महाविद्यालयांसाठी प्रवेश अर्जासहित माहिती प्रवेश पुस्तिका (Prospectus with Admission Form ) ची किंमत कायद्याने काय आहे तसेच राज्य शासनाने ठरविलेल्या दरापेक्षा अधिक रक्कम वसूल केल्यास पालक अथवा विद्यार्थ्यांनी काय कार्यवाही करावी याबाबत त्यांना कायद्याने माहिती व्हावी म्हणून हा लेख जाहीर करत आहे.

अत्यंत महत्वाचे-
प्रवेश अर्जासहित माहिती प्रवेश पुस्तिका (Prospectus with Admission Form) दर रू.२०/ निर्धारित-
ज्या वरिष्ठ महाविद्यालयात केंद्रीय पद्धतीने प्रवेश देण्यात येतो त्याबाबत राज्य सरकारने दिनांक १ डिसेंबर २००१ रोजी परिपत्रक जाहीर करून प्रवेश देताना माहिती प्रवेश पुस्तिकेसाठी केवळ रू.२०/- शुल्क आकारावे असे कायद्याने बंधन टाकण्यात आलेले आहे.

प्रवेश व गुणवत्ता यादीतील घोटाळे व त्याविरोधात तक्रार प्रणाली-
तसेच कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया करताना खालील प्रक्रिया त्यांना पाळणे बंधनकारक करण्यात आलेले आहे-
प्रवेश देताना ठराविक गुणांच्या टक्केवारीची अट न लावता प्रत्येक महाविद्यालय हे विद्यार्थ्यांची एक गुणवत्ता यादी (Merit List) जाहीर करेल. ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे नाव, मिळालेले गुण व प्रवेश दिला गेला की नाकारला गेला याचा उल्लेख करेल. सदर यादी महाविद्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येईल व संबंधित विद्यापीठासही कळविण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांची सदर यादी बाबत तक्रार असेल त्यांना महाविद्यालय रू.२०/- पर्यंत शुल्क आकारून ते उपलब्ध करून देईल.संबंधित विद्यार्थी त्याची तक्रार ही संबंधित विद्यापीठाकडून नियुक्त करण्यात आलेल्या समितीकडे दाखल करू शकेल.
वर नमूद केलेल्या परिपत्रकाची प्रत खालीलप्रमाणे-

महाविद्यालयातील प्रवेश अर्जासाठी शुल्क निश्चितीबाबतचा नियम व प्रवेश प्रक्रियेबाबत तक्रार प्रणाली
महाविद्यालयातील प्रवेश अर्जासाठी शुल्क निश्चितीबाबतचा नियम व प्रवेश प्रक्रियेबाबत तक्रार प्रणाली

शासनाने निर्धारित केलेल्या शुल्कपेक्षा अतिरिक्त शुल्क आकारल्यास पालक अथवा विद्यार्थ्यांनी कोणती कार्यवाही करावी?-
याबाबत पालक अथवा विद्यार्थ्याने शुल्क आकारल्याच्या ३० दिवसांच्या आत देणगी विरोधी कायदा १९८७ अंतर्गत स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार करावी. तसेच ३० दिवसांचा कालावधी संपून गेल्यास याबाबत शिक्षण विभागात तक्रार करावी व त्यांना देणगी विरोधी कायदा १९८७ च्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी करावी तसेच आपल्याकडून आकारण्यात आलेले अतिरिक्त शुल्क सव्याज परतावा देण्यासाठी अर्ज करावा. तसेच तक्रारदार विद्यार्थी अथवा पालक या विरोधात ग्राहक न्यायालयात तक्रार अर्ज दाखल करून नुकसानभरपाई प्राप्त करू शकतात असे  माझे मत आहे. देणगीविरोधी कायद्याबाबत सविस्तर लेख जाहीर केलेला आहे तो जरूर वाचावा, त्याची लिंकही खालीलप्रमाणे आहे-
महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (कॅपिटेशन फी घेण्यास प्रतिबंध) अधिनियम १९८७- देणगीविरोधी कायद्यातील तरतुदी

एकंदरीत दिवसाढवळ्या कशी लूट चालू आहे व शिक्षणाचे बाजारीकरण कसे उघडपणे होत आहे हे या परिपत्रकाद्वारे स्पष्ट होते. हे परिपत्रक न्यायालयाने एकाच विद्यार्थ्यास अनेक महाविद्यालयात प्रवेश घेताना अनेक अर्ज व माहिती पुस्तिका घ्यावा लागतात आणि त्यास प्रचंड आर्थिक भुर्दंड पडतो याची दखल घेऊन दिलेल्या निर्णयानंतर हा दर निर्धारित करण्यात आला आहे. एकंदरीत अशा लुटीविरोधात विद्याथी व पालकांनी निर्धाराने लढा द्यावा व अशी उघड लूट करणाऱ्या शिक्षणसंस्थांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत असे आवाहन संघटनेतर्फे करत आहे.

हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेअर करा, खाली दिलेले आमचे विविध फेसबुक व ट्विटर खातेंवर ‘Like’ व  ‘Follow’ करा, फेसबुक पेजला ‘Like’ केल्यानंतर सुद्धा पेजवरील ‘Follow’ बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कुठलेही यापुढील लेख जाहीर केले तर त्याचे थेट अपडेट आपणास भेटतील.तसेच या पेजच्या खालील  Subscribe Box मध्ये आपला ई मेल टाकून Subscribe जरूर करा, जेणेकरून या वेबसाईटवरील प्रत्येक इंग्रजी, हिंदी व मराठीतील लेख हे थेट आपल्या ई-मेल वर प्राप्त होईल, जयहिंद!
संघटनेचे फेसबुक पेज लिंक-
https://www.facebook.com/jaihindbks
ट्विटर पेजचे लिंक-
https://twitter.com/jaihindbks
-ॲड.सिद्धार्थशंकर अ. शर्मा
(संस्थापक, अध्यक्ष, भारतीय क्रांतिकारी संघटना)


सूचना- कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा व अद्ययावत माहिती घ्यावी, अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.


Share

Leave a Reply